तीन दिवसांत ३१२ कोटींची गंगाजळी?

By admin | Published: November 19, 2016 12:48 AM2016-11-19T00:48:00+5:302016-11-19T00:56:46+5:30

अच्छे दिन : नोटाबंदीचा परिणाम

312 crore reserves in three days? | तीन दिवसांत ३१२ कोटींची गंगाजळी?

तीन दिवसांत ३१२ कोटींची गंगाजळी?

Next

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला चलनातील ५०० व १०००च्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे दिसू लागली होती. ११ ते १३ या तीन दिवसांत जिल्हा बॅँकेच्या गंगाजळीत घसघशीत ३१२ कोटींची वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसूून येते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला गेल्या वर्षी पीककर्जाची वसुली करण्यास सरकारनेच बंदी घातल्यानंतर पीककर्ज वसुलीचा वेग मंदावला होता. एकूण पीककर्जाच्या अवघे ६० टक्के पीककर्ज वसुली झाली होती. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पीककर्ज वसुली चांगली होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात यावर्षीही पीककर्ज वसुलीचा वेग मंदावलेलाच होता. त्यातच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १०००च्या नोटा रद्द करण्याचा रातोरात निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागासह शहरी भागातील उच्च मध्यमवर्गीय व उच्चभ्रू व्यक्तींना धक्का बसल्याची चर्चा होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून तोपर्यंत ११ नोव्हेंबरपासून चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा इतर बॅँकांमध्ये स्वीकारण्यात येत होत्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी सुमारे ७९ कोटींहून अधिक रक्कम बचत व चालू खात्यात जमा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसऱ्या दिवशी १५१ कोटी, तर तिसऱ्या दिवशीही बॅँकेत रक्कम जमा होण्याचा वेग कायम होता.(प्रतिनिधी)

Web Title: 312 crore reserves in three days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.