जिल्ह्यात ३१८ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:31 AM2020-12-13T04:31:15+5:302020-12-13T04:31:15+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार ११४ वर पोहोचली असून, त्यातील ९९ हजार ७८० रुग्ण ...
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार ११४ वर पोहोचली असून, त्यातील ९९ हजार ७८० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३,४७६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९४.९३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.५२, नाशिक ग्रामीणला ९४.०१, मालेगाव शहरात ९२.६४, तर जिल्हाबाह्य ९२.०४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३,४७६ बाधित रुग्णांमध्ये २,१६५ रुग्ण नाशिक शहरात, १,१२६ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १५५ रुग्ण मालेगावमध्ये, तर ३० रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख १ हजार ८८० असून, त्यातील २ लाख ९५ हजार ६४७ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ५,११४ रुग्ण बाधित आढळून आले असून, १,११९ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.