31 डिसेंबर 'नीट' साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 06:08 PM2019-12-30T18:08:44+5:302019-12-30T18:19:18+5:30
वैद्यकीय विद्याशाखेच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. यातील पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या ३ मे रोजी घेतली जाणार असून परीक्षेचा निकाल येत्या ४ जून रोजी जाहीर करणार असल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाºया नीट परीक्षेसाठीआॅनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून मंगळवारी (दि.३१) नीट साठी अर्ज करण्याची अखेरची मूदत आहे. त्यामुळे या परीक्षेला प्रविष्ठ होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना मंगळावारी अर्ज भरण्यची प्रक्रिया पूर्ण करून १ जानेवारी २०२० पर्यंत परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.
वैद्यकीय विद्याशाखेच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. यातील पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या ३ मे रोजी घेतली जाणार असून परीक्षेचा निकाल येत्या ४ जून रोजी जाहीर करणार असल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यसक्राच्या जागांमध्ये यावर्षी वाढ झाली असली तरी प्रवेशाचा ‘कटआॅफ’ही वाढण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसून येणार आहे. देशभरातील व महाराष्ट्रातील वैद्यकीय एमबीबीएस, बीएचएमएस,बीएएमएस वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातून या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी या परीक्षेत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण कमीच आहे. सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी नीट परीक्षेत चांगले यश मिळवत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मेडिकलला जाणारे विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. तसेच नीट परीक्षेची तयारी करून घेणाºया खासगी क्लासमध्ये प्रवेश घेणारे विद्याथीर्ही वाढत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचा अर्ज भरण्यास केवळ एकच दिवसाचा कालावधी उरला असल्याने विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अर्ज भरावा, असे आवाहन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी केले आहे.