नाशिकमध्ये एकाच दिवशी ३३ कोरोना रूग्ण
By Sandeep.bhalerao | Published: April 3, 2023 05:34 PM2023-04-03T17:34:48+5:302023-04-03T17:35:12+5:30
राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांनाच नाशिकमध्ये देखील रूग्णसंख्या वाढल्याने ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या ७४ इतकी झाली आहे.
नाशिक: पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये कोरेाना रूग्णांची संख्या वाढत असून रविवारी एकाच दिवशी ३३ कोरेाना रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांनाच नाशिकमध्ये देखील रूग्णसंख्या वाढल्याने ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या ७४ इतकी झाली आहे.
नाशिकमध्ये कोविडबरोबरच 'एच-३ एन-२' (एच३एन२) चा देखील धोका असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना दक्षतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात एकाच दिवशी १२ कोरोना रूग्ण आढळून आले होते तर रविवारी एकदम ३३ रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १८ रूग्ण नाशिक महापालिका हद्दीतील आहे तर १४ रूग्ण नाशिक ग्रामीण विभागात आढळून आले. मालेगावमध्ये मात्र एकच रूग्ण आढळून आला आाहे. सुदैवाने जिल्ह्यात कुठेही रूग्ण दगावल्याची घटना घडलेली नाही.