३३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:09 AM2018-07-06T01:09:36+5:302018-07-06T01:09:58+5:30
येवला : तालुक्यातील ३३ गावे व १९ वाड्यांना १८ टँकरद्वारे अद्यापही पाणीपुरवठा सुरूच आहे, जूनअखेर मुदत संपल्याने तो बंद करण्यात आला होता.
येवला : तालुक्यातील ३३ गावे व १९ वाड्यांना १८ टँकरद्वारे अद्यापही पाणीपुरवठा सुरूच आहे, जूनअखेर मुदत संपल्याने तो बंद करण्यात आला होता.
तालुक्यातील पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने या भागात विहिरी, हातपंप यांना पाणी उतरले नसल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्रता कमी झालेली नाही. जून अखेर बंद झालेल्या पाणीपुरवठ्यासाठी येवला पंचायत समितीने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मुदतवाढ घेण्यासाठी केलेला प्रयत्न फळास आला आणि जुलैअखेर पाणीटंचाईला मुदतवाढ मिळाली.
संभाजीराजे पवार, सभापती नम्रता जगताप यांनी केलेल्या मागणीमुळे १ जुलै ते ४ जुलै बंद असलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. तालुक्यातील ३३ गावे व १९ वाड्यांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत येवला तालुक्यातील गावामध्ये अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाची स्थिती जुलैअखेर
होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ..या गावांना पाणीपुरवठा सुरूचबाळापूर, कुसुमाडी, चांदगाव, खैरगव्हाण, जायदरे, आहेरवाडी, वाईबोथी, कासारखेडे, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, खिर्डीसाठे, लहित, गुजरखेडे, सोमठाण जोश, पांजरवाडी, अनकाई, राजापूर, तांदूळवाडी, वाघाळे, गारखेडे, आडगाव रेपाळ, डोंगरगाव, कौटखेडे, तळवाडे (शिवाजीनगर), नायगव्हाण, हडपसावरगाव, भुलेगाव, रेंडाळे, धनकवाडी, देवदरी, नीळखेडे, पन्हाळसाठे, गारखेडा, वसंतनगर, सायगाव येथील नगरसूल परिसरातील वाड्यावस्तीवर पाणीपुरवठा केला जात आहे.