३३४ हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली
By admin | Published: March 2, 2016 11:15 PM2016-03-02T23:15:31+5:302016-03-02T23:20:40+5:30
चार कोटी ६२ लाखांचा निधी मंजूर
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी व कीर्तांगळी येथे देवनदीवर कोल्हापूर पद्धतीचे दोन बंधारे होत असून, यामुळे या परिसरातील सुमारे ३३४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर देवनदीचे गोदावरीला वाहून जाणारे पाणी या दोन बंधाऱ्यांमुळे सिन्नर तालुक्यातच अडविण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.
आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठपुराव्यामुळे लघुसिंचन (जलसंधारण) विभागाकडून या दोन बंधाऱ्यांसाठी चार कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वडांगळी येथील बंधाऱ्याची साठवण क्षमता ३०.६० दशलक्ष घनफूट असणार आहे, तर कीर्तांगळी येथील बंधाऱ्यात सुमारे २६.७३ दशलक्ष घनफूट पाणी साठणार आहे. यामुळे सुमारे ३३४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.
या कामासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली असून, येत्या शुक्रवारी (दि. ४) या दोन्ही बंधाऱ्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जलसंधारण विभागाने वडांगळी बंधाऱ्यासाठी दोन कोटी ४८ लाख ५७ हजार, तर कीर्तांगळी येथील बंधाऱ्यासाठी दोन कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या दोन बंधाऱ्याचा फायदा वडांगळी, खडांगळी, कीर्तांगळी, मेंढी, चोंढी, निमगाव-देवपूर या गावातील शेतकऱ्यांना होणार आहे. (वार्ताहर)
शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा
पेठ : येथील जनता विद्यालयासमोरील मैदानावर हौसी शिक्षक क्रिकेटशौकिनांनी नुकत्याच स्पर्धा भरवल्या होत्या. यामध्ये अखेरच्या सामन्यात प्रगती शिक्षक क्रिकेट संघाने एन्नती शिक्षक
क्रिकेट संघावर मात करत मालिका
३-२ ने जिंकली़ (वार्ताहर)