३३८ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 02:48 PM2019-02-11T14:48:34+5:302019-02-11T14:48:43+5:30

सिन्नर : नाशिक जिल्ह्यात हेल्मेट सक्तीच्या मोहिमेत सिन्नर तालुक्यात तीन पोलीस ठाण्याअंतर्गत गेल्या आठ दिवसात केलेल्या कारवाईत ३३८ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

 338 Action on Uninhaldt Two Wheelers | ३३८ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

३३८ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

Next

सिन्नर : नाशिक जिल्ह्यात हेल्मेट सक्तीच्या मोहिमेत सिन्नर तालुक्यात तीन पोलीस ठाण्याअंतर्गत गेल्या आठ दिवसात केलेल्या कारवाईत ३३८ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे १ लाख ६९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील सिन्नरसह वावी, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हेल्मेट तपासणी मोहीम गेल्या आठवडाभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सिन्नर-शिर्डी रस्ता, सिन्नर-घोटी, सिन्नर-संगमनेर, सिन्नर- नाशिक या मुख्य मार्गावर अन्य ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकीस्वारांचे हेल्मेट व कागदपत्रांची पाहणी करण्यात येते. त्याचबरोबर चारचाकी वाहनचालकांना सीट बेल्ट वापरण्याबाबत प्रबोधन केले जाते. सीट बेल्ट नसलेल्या २९८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ६१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक संदीपकुमार बोरसे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली प्रभावीपणे मोहीम राबविण्यात येत आहे. सिन्नर पोलीस ठाण्याअंतर्गत अंतर्गत विनाहेल्मेट १५१ वाहनचालकांवर कारवाई करून ७५ हजार ५०० रु पये, तर मोटार वाहन नियम तोडणाच्या ६१ वाहनधारकांवर कारवाई करून १२ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. मुसळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत विनाहेल्मेट ८९ वाहनचालकांवर कारवाई करून ४४ हजार ५०० रुपयेतर मोटार वाहन नियम तोडणा-या ८७ वाहनधारकांवर कारवाई करून१५ हजार ४०० रु पये दंड वसूल केला. वावी पोलीस स्टेशन अंतर्गत विनाहेल्मेट ९८ वाहनचालकांवर कारवाई करून ४९ हजार रुपये तर मोटार वाहन नियम तोडणाच्या १५० वाहनधारकांवर कारवाई करून ३० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

Web Title:  338 Action on Uninhaldt Two Wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक