कादवाच्या १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 01:35 AM2022-03-24T01:35:15+5:302022-03-24T01:35:38+5:30
कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ३६ उमेदवारांनी माघार घेतली असून १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निशाणी वाटप करत यादी प्रसिद्ध केली आहे.
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ३६ उमेदवारांनी माघार घेतली असून १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निशाणी वाटप करत यादी प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, विरोधी गटाचे प्रवीण जाधव, दिलीप जाधव, हर्षवर्धन कावळे यांनी त्यांच्या बाद झालेल्या अर्जास उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यात न्यायालयाने त्यांचे अर्ज वैध केले असल्याचे समजते. माघारी प्रक्रिया निशाणी वाटप झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिल्याने आता नेमकी काय प्रक्रिया राबविली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असून गुरुवारी (दि.२४) न्यायालयाच्या निकालाचा आदेश प्राप्त होऊन कार्यवाही होण्याची शक्यता आहे. अजून तीन उमेदवार रिंगणात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाने कादवा विकास पॅनल करता प्रचाराचा शुभारंभ केला आहे. विरोधी गटाने परिवर्तन पॅनल करत जोरदार शह देण्याची तयारी केली आहे.