सराईत गुन्हेगारांकडून ३४ तोळे सोने जप्त

By admin | Published: May 27, 2017 12:20 AM2017-05-27T00:20:12+5:302017-05-27T00:20:29+5:30

नाशिक : घरफोडीतील संशयित गोपाळ जगन्नाथ पाटील, सागर दिलीप पवार आणि कुणाल विशाल सूर्यवंशी या तिघा संशयितांना अटक केली

34 gold medal seized from Saraiat criminals | सराईत गुन्हेगारांकडून ३४ तोळे सोने जप्त

सराईत गुन्हेगारांकडून ३४ तोळे सोने जप्त

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सरकारवाडा पोलिसांनी जबरी चोरी, घरफोडीतील संशयित गोपाळ जगन्नाथ पाटील, सागर दिलीप पवार आणि कुणाल विशाल सूर्यवंशी  या तिघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३४ तोळे सोन्याचे दागिने व आठ मोबाइल जप्त केले आहेत़
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये पवार, पाटील व सूर्यवंशी या तिघांना अटक करण्यात आली आहे़ त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली देत ३४ तोळे सोने व मोबाइल असा ऐवज काढून दिला़ तर कॉलेजरोडवरील श्री ओम श्री इच्छामणी मंदिरात २०१६ मध्ये झालेल्या चोरीमध्ये संशयित डी. डी. वाघमारे व सनी बाळू चव्हाण ऊर्फ लंब्या या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मंदिरातून चोरलेली पितळी समई जप्त करण्यात आली आहे़ सीबीएस व मेळा बसस्थानकात होत असलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या सापळ्यात संशयित कांताबाई ऊर्फ मीराबाई विनोद सूर्यवंशी या महिलेला अटक करण्यात आली आहे़ तिच्या चौकशीत तिने दोन गुन्हे केल्याची कबुली देत चोरीचे ७.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांना काढून दिले आहेत़

Web Title: 34 gold medal seized from Saraiat criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.