ताठेच्या गुदामातून ३४ लाखांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:14 AM2018-07-12T01:14:17+5:302018-07-12T01:14:31+5:30
केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नेटवर्क तयार करून गांजाची तस्करी करणाऱ्या शिवसेनेची महिला पदाधिकारी संशयित लक्ष्मी ताठे हिच्या औरंगाबाद रोडवरील जनार्दननगरमधील गुदामावर शहर गुन्हे शाखेने बुधवारी (दि़ १०) छापा टाकत पोलिसांनी ३४ लाख ५० हजार रुपयांचा ६९० किलो गांजा जप्त केला. ताठेचा जावई सुमित बोराळे (रा़ अंबड) व त्याचा साथीदार सुरेश महाले (रा़ पंचवटी) यांना अटक झाली आहे़
पंचवटी : केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नेटवर्क तयार करून गांजाची तस्करी करणाऱ्या शिवसेनेची महिला पदाधिकारी संशयित लक्ष्मी ताठे हिच्या औरंगाबाद रोडवरील जनार्दननगरमधील गुदामावर शहर गुन्हे शाखेने बुधवारी (दि़ १०) छापा टाकत पोलिसांनी ३४ लाख ५० हजार रुपयांचा ६९० किलो गांजा जप्त केला. ताठेचा जावई सुमित बोराळे (रा़ अंबड) व त्याचा साथीदार सुरेश महाले (रा़ पंचवटी) यांना अटक झाली आहे़ ११ जून रोजी तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ उभ्या असलेल्या आयशरमधून गांजा मागविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाºयांना मिळाली होती़ त्यानुसार या पथकाने कारवाई करून या वाहनातून ३५ लाख रुपये किमतीचा ६८० किलो गांजा जप्त केला होता़ पोलिसांनी जप्त केलेला गांजा हा ओडिसा येथून मागविण्यात आल्याचे तसेच त्याचे वितरण हे नाशिक शहर व जिल्ह्णासह संपूर्ण राज्यात केले जाणार असल्याची माहिती तपासात समोर आली़ आयशरचालक व त्याच्या साथीदारास अटक केल्यानंतर गांजातस्करीत शिवसेनेची महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे व तिच्या सहकाºयाचा हात असल्याचे समोर आले़
पोलिसांनी तपोवनात गांजा पकडल्यानंतर ताठे फरार झाली तर याच कालावधीत पोलिसांनी सिन्नर येथून ३९० किलो गांजा जप्त केला़ पोलिसांच्या कारवाईनंतर ताठे हिने सुरुवातीला कर्णनगर येथील घरी व त्यानंतर कारवाईच्या भीतीने हा गांजा नवनाथनगरला लपवून ठेवला होता़ तीन ते चार दिवसांपूर्वीच ताठे हिचा जावई सुमीत बोराळे याने मंडपवाला साथीदार सुरेश महाले याच्या मदतीने हा गांजा औरंगाबादरोडवरील जनार्दननगरच्या गुदामात लपवून ठेवला़ पोलीस कोठडीत असलेल्या ताठेच्या चौकशीत ७०० किलो गांजा हा गुदामात असल्याची माहिती समोर आली़
पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बलराम पवार, वसंत पांडव, येवाजी महाले, संदीप भांड, विशाल देवरे, रवि बागुल, विशाल काठे यांनी बुधवारी (दि़ ११) दुपारी या गुदामात छापा टाकून ६९० किलो गांजा जप्त केला़ गांजातस्करीच्या रॅकेटमध्ये आतापर्यंत पोलिसांनी अकरा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, नऊ जणांना अटक केली असून एक कोटीहून अधिक रुपयांचा १ टन ७६० किलो गांजा जप्त केला आहे़
साथीदार फरार
गांजा तस्करीच्या रॅकेटमध्ये पोलिसांनी आतापर्यंत ओडिसाहून गांजाचा पुरवठा करणारा अकबर सदबल खान (रा. जयपोर, ओडिसा), आयशर वाहनातून गांजाची वाहतूक करणारे यतिन शिंदे व सुनील शिंदे, सिन्नर येथून संतोष गोळेसर, जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथून सुरेश रामसिंग बेलदार व सुखदेव शहादेव पवार तर पंचवटीतून लक्ष्मी ताठे यांना अटक केली आहे़ दरम्यान, तस्करीतील ताठेचा साथीदार अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे़