गरजू विद्यार्थ्यांना लायन्सकडून ३४ मोबाइल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:45+5:302021-06-21T04:10:45+5:30
नाशिक : शहरात झालेल्या लायन्सच्या ऋतुरंग या झोनल परिषदेमध्ये जिल्ह्यातील ३४ गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाइलवाटप करण्यात ...
नाशिक : शहरात झालेल्या लायन्सच्या ऋतुरंग या झोनल परिषदेमध्ये जिल्ह्यातील ३४ गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाइलवाटप करण्यात आले. तसेच लायन्सच्या वतीने अन्नपूर्णा गृहाचे उद्घाटन प्रांतपाल अभय शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.
कर्तृत्ववान मोजक्याच लायन्सच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत पुण्याहून प्रांतपाल अभय शास्त्री व माधुरी शास्त्री या उपस्थित होत्या. या परिषदेमध्ये माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव ,मिलिंद पोफळ ,विनोद कपूर , उपप्रांतपाल राजेश कोठावदे यांच्यासह विविध लायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
झोनल परिषदेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना प्रांतपालांच्या हस्ते मोबाइल भेट देण्यात आले. झोनल अध्यक्ष लायन रितू चौधरी ह्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली .झोन मध्ये एकूण सहा लायन्स क्लब असून त्यांचा सक्रिय सहभाग होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर कोणतेही करमणूक कार्यक्रम न ठेवता केवळ कामकाजाचा आढावा घेण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव यांनी सांगितले. तसेच लायन्स पंचवटीने सुरगाणा येथे लागणाऱ्या औषधांचे प्रायोजकत्व स्वीकारून सामाजिक उपक्रमाला बळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. रितू चौधरी यांच्या झोनने या वर्षांत सर्वोत्तम कार्य केले असून, कोविडसाठी झोनमधील क्लबनी स्वत:ला झोकून देऊन कार्य करीत असल्याबद्दल अभिनंदन केले. अंध महिलांसाठी एक विशेष मोहीम ,कार्यशाळा, त्यां पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण सुरु करण्याचे मत वैद्य नीलिमा जाधव यांनी व्यक्त केले. ,लायन्स पंचवटीचे हे आठवे कायम स्वरूपी कार्य असल्याचा अभिमान प्रकल्प संयोजक लायन अरुण अमृतकर यांनी व्यक्त केला. या माध्यमातून एक उत्तम स्वयंपाक घर आणि अन्नगृह मिळाल्याचा आनंद आहे, असे मत अंधगृहातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
इन्फो
विशेष कार्याचा गौरव
वैद्य विक्रांत जाधव यांनी सुरगाणा तालुक्यामधील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल शासनाने घेतली असून हे कार्य संपूर्ण विश्वामध्ये लायन्सच्या माध्यमातून नक्की पोहचवू, असेही प्रांतपाल शास्त्री यांनी नमूद केले. प्रेमलता मिश्र, विजया पगारे, हंसराज देशमुख यांनी कोविडसाठी योगदान देऊन उत्तम कार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक प्रांतपालांनी केले.तसेच यावेळी अन्नपूर्णा गृहाचे उद्घाटन प्रांतपाल शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्य केलेल्या व आंतरराष्ट्रीय संघटनेकडून कौतुक झालेल्या मध्ये अरुण अमृतकर , रितू चौधरी, सुनील देशपांडे,नुपूर प्रभू, प्रेमलता मिश्र , हंसराज देशमुख, विजया पगारे, यांना विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. झोनमधील महेश सोमण, श्यामकांत जगताप, अनंत हिरे, नंदेश यंदे यांचे विशेष कौतुक त्यांच्या अन्नपूर्णा गृह, ऑक्सिजन बँकमधील विशेष योगदानाबद्दल करण्यात आले. डॉ. नूपुर प्रभू, अमित प्रभू व स्टार क्लबच्या पुढाकाराने धान्य दानाची विशेष मोहीम राबवण्यात आली. त्याला लोक सहभाग मिळवून देणाऱ्यांचे कौतुक रितू चौधरी यांनी केले.