व्यापारी बॅँकेसाठी ३४ टक्के मतदान

By admin | Published: June 26, 2017 12:04 AM2017-06-26T00:04:41+5:302017-06-26T00:12:53+5:30

नाशिकरोड : नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या रविवारी झालेल्या मतदानात ३४.६३ टक्के इतके मतदान झाले.

34 percent polling for the merchant bank | व्यापारी बॅँकेसाठी ३४ टक्के मतदान

व्यापारी बॅँकेसाठी ३४ टक्के मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या रविवारी झालेल्या मतदानात ३४.६३ टक्के इतके मतदान झाले. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ११ मतदान केंद्रांवर अंत्यत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सोमवारी सकाळी ८ वाजता जेलरोड येथील के. एन. केला हायस्कूलमध्ये मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
व्यापारी बैठक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ सहकार व प्रतिस्पर्धी श्री व्यापारी पॅनलमध्ये सरळ लढत होती. सहकार पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे व श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर करीत आहेत. दत्तमंदिर रोड येथील मनपा शाळा क्रमांक १२५ मध्ये ७८८० मतदार असून, त्यापैकी २७१४ इतके मतदान झाले. आर्टिलरी सेंटररोड संत आनंदऋषी शाळेत ५७२३ पैकी २१८१, के. एन. केला हायस्कूल केंद्रावरील ११४९१ पैकी ४४७७, चेहडी मनपा शाळेतील केंद्रावर ६५९० पैकी ३३२८, नेहरूनगर मनपा शाळा ५००९ पैकी १४१६, कॅन्टोन्मेट हायस्कूल ४५०६ पैकी १७९४, जि.प. शाळा भगूर येथे ४३४३ पैकी २०८९, केबीएच विद्यालय, सिडकोत ३१३३ पैकी ६०१, व्ही. एन. नाईक महाविद्यालय नाशिकमध्ये ८१३९ पैकी ११५०, वाजे हायस्कूल, सिन्नर येथे २१०७ पैकी ८८६, स्वामी विवेकानंद विद्यालय, इंदिरानगर येथे २४७६ पैकी ६२८, असे एकूण ६१ हजार ३९७ पैकी २१ हजार २६४ मतदान झाले.
रविवारी सकाळी ८ वाजता मतदानप्रक्रियेला सुरुवात झाली. मनपा शाळा क्रमांक १२५, संत आनंदऋषी शाळा, के. एन. केला हायस्कूल, चेहडी, देवळाली कॅम्प,

Web Title: 34 percent polling for the merchant bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.