महिनाभरात ३४ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:48 PM2020-07-09T19:48:27+5:302020-07-10T00:22:30+5:30
नाशिक : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३४ टक्के पावसाची नोंद झाली असून खरीपाच्या पेरण्यांना गति आली आहे. आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९१ टक्के पाऊस झाला आहे तर त्यापाठोपाठ निफाड (८२.३२ टक्के) आणि मालेगाव (७५.१७ टक्के) तालुक्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील पेठ तालुका पर्जन्यमानात सर्वात पिछाडीवर आहे.
नाशिक : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३४ टक्के पावसाची नोंद झाली असून खरीपाच्या पेरण्यांना गति आली आहे. आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९१ टक्के पाऊस झाला आहे तर त्यापाठोपाठ निफाड (८२.३२ टक्के) आणि मालेगाव (७५.१७ टक्के) तालुक्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील पेठ तालुका पर्जन्यमानात सर्वात पिछाडीवर आहे. पेठ तालुक्यात आतापावेतो अवघा १४.३९ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
नाशिक जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १५,००४.६९ मि.मी. इतके आहे. त्यात पावसाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या आणि सर्वाधिक धरणांचा तालुका असलेल्या इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक ३०५७.९८ सरासरी पर्जन्यमान असते. तर सर्वात कमी पर्जन्यमान देवळा तालुक्यात ४२२.०७ मि.मी. नोंदविले जाते.
---------------------
१ यावर्षी हवामान खात्याने सरासरी इतक्या पावसाचा अंदाज यापूर्वीच वर्तविलेला आहे. त्यानुसार महाराष्टÑात मान्सूनचे वेळेत आगमन होऊन जिल्ह्यातही सर्वत्र पावसाने आतापर्यंत समाधान कारक हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यात १ जून ते ९ जुलै २०२० या कालावधीत सरासरी ३३९.८३ मि.मी. म्हणजेच ३३.९७ टक्के पावसाची नोंद झालेली आहे.
२ मागील वर्षी याच कालावधीत सरासरी ३०५.५१ मि.मी. पाऊस कोसळला होता. यंदा त्यात वाढ झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९०.९५ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. सरासरीच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या बागलाण तालुक्यात मागील वर्षी याच कालावधीत कमी पर्जन्यमान नोंदले गेले होते. त्यावेळी अवघा १०३ मि.मी. पाऊस झाला होता.
३ यंदा मात्र ४८८.२० मि.मी. वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी असलेल्या बागलाण तालुक्यात आतापर्यंत ४४४ मि.मी. पाऊस नोंदविला गेला आहे. निफाड आणि अवर्षणग्रस्त मालेगाव तालुक्यातही यंदा ७५ टक्क्यांवर पाऊस झालेला आहे. खरीपाच्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. मागील वर्षी पेठ तालुक्यात जून-जुलै कालावधीत ८५५ मि.मी. पाऊस कोसळलेला होता.