नाशिकमध्ये ३४ शाळांनी प्राप्त केला अल्पसंख्याक दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 08:56 PM2018-02-13T20:56:59+5:302018-02-13T21:02:47+5:30

आरटीईतून सूट : आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठींच्या जागांमध्ये घट

 34 schools have received minority status in Nashik | नाशिकमध्ये ३४ शाळांनी प्राप्त केला अल्पसंख्याक दर्जा

नाशिकमध्ये ३४ शाळांनी प्राप्त केला अल्पसंख्याक दर्जा

Next
ठळक मुद्दे २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्हाभरातून ४६६ शाळांनी नोंदणी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेतल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मात्र या शाळांमध्ये मिळू शकणा-या शिक्षणापासून वंचित

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्हाभरातून ४६६ शाळांनी नोंदणी केली आहे. मात्र गेल्या वर्षी या प्रक्रियेअंतर्गत सहभाग घेणा-या जवळपास ३४ शाळांनी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून या प्रक्रियेतून सूट मिळवली आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संधी संपुष्टात आल्या आहेत.
शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षणाचा हक्क कायदा २००९ अंतर्गत दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रि या राबविली जाते. परंतु, गेल्या वर्षभरात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यापासून ते वेगळ्या वर्गात बसविण्याच्या घटना घडल्यानंतर यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेतून तब्बल ३४ शाळांनी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतून काढता पाय घेतला आहे. विशेष म्हणजे या शाळांना आता अल्पसंख्याक समुदायांच्या शाळांना मिळणा-या सर्व सोयीसुविधा सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाकडून मिळणार आहेत. परंतु, केवळ अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेतल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मात्र या शाळांमध्ये मिळू शकणा-या शिक्षणापासून वंचित झाले आहेत.
इन्फो-
शहरातील इंग्रजी माध्यमाच्या ३४ शाळांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त झाल्याने या शाळांना आरटीई प्रवेश प्रक्रि येतून सूट मिळाली आहे. असे असतानाही उर्वरित ४६६ शाळांमधील ६ हजार ५८९ जागावर आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेकरिता जिल्हाभरातून चार दिवसांत अडीच हजार आॅनलाइन अर्ज दाखल झाले आहेत.

Web Title:  34 schools have received minority status in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक