३४ कामगारांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 07:07 PM2018-09-11T19:07:27+5:302018-09-11T19:09:12+5:30
मुसळगाव औद्योगिक वसाहतीतल्या साईटेक स्पॅश्लििटीज या कारखान्यातील ३४ कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने कोणतीही नोटीस न देता कामावरुन कमी केल्याचा आरोप महाराष्टÑ राज्य राष्टÑीय कामगार संघाच्या (इंटक) जिल्हा पदाधिकाऱ्यांसह कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या कामगारांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
सिन्नर : मुसळगाव औद्योगिक वसाहतीतल्या साईटेक स्पॅश्लििटीज या कारखान्यातील ३४ कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने कोणतीही नोटीस न देता कामावरुन कमी केल्याचा आरोप महाराष्टÑ राज्य राष्टÑीय कामगार संघाच्या (इंटक) जिल्हा पदाधिकाऱ्यांसह कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या कामगारांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. महाराष्टÑ राज्य राष्टÑीय कामगार संघाचे जिल्हा सचिव बाळासाहेब वाघ, जिल्हा संघटक ईश्वर वाघ यांच्यासह यांच्यासह कामगारांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन कारखाना व्यवस्थापनावर आरोप केला आहे. कामगार १० ते १२ वर्षापासून या कारखान्यात काम करीत होते. या कामगारांनी कामगार संघटनेची स्थापना केली होती. मात्र कामगार संघटना स्थापन केल्याचा राग आल्यानेच कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कोणतीही नोटीस न देता ९ एप्रिल २०१८ पासून कामावरुन कमी केल्याचा आरोप कामगारांनी केला. वारंवार कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला तथापि, मालक व व्यवस्थापन दाद देत नसल्याचे कामगारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सर्व कामगार सिन्नर तालुक्यातील असून आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न मात्र कारखाना व्यवस्थापनाने दुरुस्तीच्या नावाखाली पोलिसांची मदत घेऊन आम्हाला हुसकावून दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे या कामगारांनी सांगितले. एकीकडे दुष्काळी, पाणीटंचाई असतांना व्यवस्थापनाने आमचा रोजगार हिरावून घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे आता आम्ही महाराष्टÑ राज्य राष्टÑीय कामगार संघटनेचे सभासद झालो असून न्यायालयात दावा दाखल केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्व कामगार बुधवार (दि. १२) पासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करणार असून त्यात अडविण्याचा प्रयत्न झाल्यास कामगार आत्मदहन करतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी बाळासाहेब वाघ, ईश्वर वाघ यांच्यासह संतोष गडाख, बाळू धोक्रट, गंगाराम वाघ, शरद सोनवणे, संदीप जाधव, संजय कुºहे, सुनील गोर्डे, रवी जाधव, गणेश शेळके यांच्यासह कामगार उपस्थित होते.