जिल्हा परिषदेसाठी ३४, पंचायत समितीसाठी ४५ अर्ज दाखल
By admin | Published: February 4, 2017 02:03 AM2017-02-04T02:03:21+5:302017-02-04T02:03:36+5:30
जिल्हा परिषदेसाठी ३४, पंचायत समितीसाठी ४५ अर्ज दाखल
नाशिक : जिल्हा परिषद गट व गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. ३) जिल्हा परिषद गटांसाठी प्रत्यक्ष ३४, तर पंचायत समिती गणांसाठी प्रत्यक्ष ४५ अर्ज दाखल करण्यात आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी (दि.१) प्रत्यक्षात एकही नाही, तर आॅनलाइनद्वारे ३७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३४ अर्ज प्रत्यक्षात दाखल झाले. त्यात बागलाण - ५, मालेगाव - ३, कळवण -२, दिंडोरी - ३, येवला - ६, निफाड - ८, नाशिक - १, इगतपुरी - ५, सिन्नर - १ असे एकूण - ३४ उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल करण्यात आले. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ४५ उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल झाले.
त्यात मालेगाव - ५, बागलाण - ३, कळवण - ४, सुरगाणा - १, दिंडोरी - ३, येवला - ५, निफाड - १३, नाशिक - ६, इगतपुरी - ४, सिन्नर - १ असे एकूण ४५ उमेदवारी अर्ज पंचायत समितीच्या गणांसाठी दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण ४८ अर्ज प्रत्यक्षात दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना व भाजपा यांची युती जिल्ह्णात अशक्य दिसत असून, तिकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसची आघाडीही सात ते आठ तालुक्यांपर्यंतच मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत. प्रत्यक्षात चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे टाळल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)