जिल्ह्यात ३४४ रुग्ण कोरोनामु्क्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:16 AM2021-01-03T04:16:24+5:302021-01-03T04:16:24+5:30
नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि. २) एकूण २७९ जण कोरोनाबाधित झाले असून ३४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल ...
नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि. २) एकूण २७९ जण कोरोनाबाधित झाले असून ३४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल केवळ नाशिक मनपा क्षेत्रातच दोघांचा मृत्यू झाला असून, एकूण बळींची संख्या १,९७४ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ६२५ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ६ हजार ९७६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत तर १,६७५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.७० वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.२३, नाशिक ग्रामीण ९६.१५, मालेगाव शहरात ९२.८५ तर जिल्हाबाह्य ९३.७२ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १,९७४ बाधित रुग्णांमध्ये ९८० रुग्ण नाशिक शहरात, ७७० रुग्ण नाशिक ग्रामीणला, १७५ रुग्ण मालेगावमध्ये तर ४९ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख ४२ हजार ०९३ असून, त्यातील ३ लाख २६ हजार ३३४ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १० हजार ६२५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
शिक्षक चाचण्यांनी वाढले प्रलंबितचे प्रमाण
जिल्ह्यात ४ जानेवारीपासून नववीपुढील वर्गांच्या शाळा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि शालेय स्टाफच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्या प्रमाणात अहवाल येत नसल्याने गत महिन्यात एक हजाराखाली असलेली प्रलंबित संख्या आता ५ हजार १३४ वर पोहोचली आहे.