आयटीआयमध्ये ३४५ जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:43+5:302021-01-03T04:15:43+5:30
आयटीआयच्या चार फेऱ्यांनंतर राज्यात आयटीआयच्या ८० हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. यात नाशिकच्या आयटीआय मध्ये फिटर, मशिनिस्ट, प्लंबर, पेंटर, ...
आयटीआयच्या चार फेऱ्यांनंतर राज्यात आयटीआयच्या ८० हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. यात नाशिकच्या आयटीआय मध्ये फिटर, मशिनिस्ट, प्लंबर, पेंटर, स्टेनोग्राफी, वायरमन, वेल्डर, टूल अँड डाय मेकर आदींसह विविध ट्रेडसाठी एकूण ३४५ जागा रिक्त आहेत. ऑगस्ट, २०२० सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत आहेत. संस्थेतील प्रवेश पूर्ण क्षमतेने होण्याकरिता दहावीच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारानांही प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश अर्ज सादर करणे व प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा दि. १ ते ४ जानेवारीपर्यंत संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. म्हणजेच यापूर्वी ज्यांनी प्रवेशासाठी अर्ज भरलेला होता, त्यांना दुरुस्ती करता येईल, तसेच नव्यानेही अर्ज भरता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना काही अडचण आल्यास त्यांनी संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य राजेश मानकर यांनी केले आहे.