बचत गटांद्वारे ३४८ मे. टन खतांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:14+5:302021-06-06T04:12:14+5:30
शासकीय विश्रामगृहाच्या आवारात खते व बियाणे विक्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर या योजनेंतर्गत राष्ट्रीय केमिकल व फर्टिलायझर कंपनी, नाशिक ...
शासकीय विश्रामगृहाच्या आवारात खते व बियाणे विक्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर या योजनेंतर्गत राष्ट्रीय केमिकल व फर्टिलायझर कंपनी, नाशिक यांच्या वतीने शनिवारी (दि.५) कुकाने येथील जय मल्हार शेतकरी बचतगटाचे अध्यक्ष भिकन लोंढे व शेतकरी यांनी एकत्रितपणे युरियाची मागणी नोंदविली होती. त्यानुसार त्यांना २०० युरिया खताच्या बॅग व १० लिटर बायोला जैविक द्रावणाचे वाटप भुसे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर नीलेश आहेर, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, एम.ए.आय.डी.सी.चे क्षेत्रीय प्रभारी अधिकारी रवींद्र पाटील, बजरंग कापसे, आर.सी.एफ.चे जिल्हा प्रभारी विशाल सोनवलकर, संजय दुसाने, संचालक दीपक मालपुरे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
इन्फो
गुणवत्ता बघूनच वापर करा
शासनाच्या वतीने यावर्षी खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात युरिया खत शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिले असले, तरी शेतकरी बांधवांनी जमिनीची सुपीकता व गुणवत्ता बघून खतांचा वापर करावा, असे आवाहन भुसे यांनी केले आहे.