मालेगावी हरणाचे ३५ किलो मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:00+5:302021-04-09T04:15:00+5:30
शहरालगतच्या दरेगाव शिवारात हरणाचे मांस नेले जात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली होती. पोलीस व ...
शहरालगतच्या दरेगाव शिवारात हरणाचे मांस नेले जात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली होती. पोलीस व वनविभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.८) अडीच वाजेच्या सुमारास दरेगाव शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. यावेळी मुदस्सीर अहमद अकील अहमद (३७) रा. चुनाभट्टी, बेलबाग, शेख शब्बीर शेख रज्जाक (४१), सय्यद मोबीन सय्यद हारुण (४३), दोघे रा. कमालपुरा हे हरणाच्या मांसाचे तुकडे करताना आढळून आले. पथकाने ३५ किलो मांस, एक दुचाकी (क्रमांक एमएच- ४१ झेड- ००२०) असा एकूण १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वन व पोलीस विभागाच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकातील पाेलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे, वनपाल आर. व्ही. देवरे, डी. एस. सूर्यवंशी, वनरक्षक एस. बी. शिर्के, आगार रक्षक आर. के. बागूल, रफिक पठाण, वनरक्षक टी. जी. देसाई, विशेष पोलीस पथकातील हवालदार वसंत महाले, विकास शिरोळे, संदीप राठोड, भुषण खैरनार, पंकज भोये आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय वन अधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे हे करीत आहेत.
फोटो फाईल नेम : ०८ एमएपीआर ०२ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी हरणाचे मांस बाळगणाऱ्या तिघा संशयित आरोपींसह उपविभागीय वनअधिकारी जगदीश येडलावार, तालुका वनअधिकारी व्ही. डी. कांबळे, पोलीस पथकातील उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, भानुदास सूर्यवंशी, एस. बी. शिर्के आदींसह पथक.
===Photopath===
080421\08nsk_25_08042021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमीसोबत आहे.