विनामास्क रेल्वे प्रवाशांकडून ३५ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 01:09 AM2021-10-11T01:09:59+5:302021-10-11T01:11:00+5:30
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीसांनी १७ एप्रिल ते ३ ऑक्टोबर या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत मास्क न घातलेल्या व्यक्ती आणि सुमारे २१ हजार प्रवाशांकडून ३५ लाख २८ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीसांनी १७ एप्रिल ते ३ ऑक्टोबर या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत मास्क न घातलेल्या व्यक्ती आणि सुमारे २१ हजार प्रवाशांकडून ३५ लाख २८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. रेल्वेत व रेल्वे स्थानक परिसरात मास्क न घालणाऱ्या व्यक्ती व प्रवाशांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड केला जातो. कोरोना काळात मास्क न घालणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेने दंड अगोदर पासूनच आकारण्यास सुरुवात केली आहे. आता कारवाईची मुदत १६ एप्रिल २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. मागील सहा महिन्यांत मध्य रेल्वेत मास्कचा वापर न करणाऱ्या २० हजार ९१० जणांकडून ३५ लाख २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोना नियंत्रणासाठी मास्कचा नियम आधीच लागू करण्यात आलेला आहे.