निफाड तालुक्यात ३५ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:35 PM2020-06-24T22:35:26+5:302020-06-24T22:36:27+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत ६९ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी ३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २० कोरोनाबाधित रुग्णावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती निफाडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सोमवारी (दि.२२) सायखेडा, चांदोरी आणि आहेरगाव येथे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर पिंपळस येथील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ते सायखेडा येथील रु ग्णाच्या संपर्कात आले होते तर सायखेडा आणि चांदोरी येथील नवीन आढळून आलेल्या रुग्णाचे कनेक्शन सायखेडा येथील आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वात पहिला रुग्ण निफाड तालुक्यातील लासलगाव येथे आढळला होता. त्यानंतर अनेक दिवस तालुक्यामध्ये रुग्ण आढळून आला नाही. नागरिकांसह, प्रशासनाने योग्य खबरदारी घेतल्यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात होती, मात्र काही दिवसांपासून निफाड तालुक्यामध्ये सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात कोरोनाचे केंद्रस्थान बनलेल्या पिंपळगाव ते सायखेडा परिसरात वेगवेगळ्या माध्यमातून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सायखेडा येथील पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कामुळे सायखेडा, चांदोरी, पिंपळस, करंजगाव या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. तालुक्यातील लासलगाव, निफाड, ओझर या गावांमध्ये रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.