३५ हजार ६४१ मतदार बजावणार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:49 PM2018-12-10T22:49:52+5:302018-12-10T22:50:09+5:30
मालेगाव : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष संक्षीप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा मतदार संघात ३५ हजार ६४१ नव मतदारांची नोंदणी झाली आहे.
मालेगाव : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष संक्षीप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा मतदार संघात ३५ हजार ६४१ नव मतदारांची नोंदणी झाली आहे.
आगामी निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच मतदानाचा हक्क नवमतदार बजावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोंबर दरम्यान विशेष संक्षीप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नवीन मतदारांना नाव नोंदण्याचे आवाहन करण्यात आले होते. बीएलओंनी ३१ आॅक्टोबर या अखेरच्या दिवसापर्यंत काम केल्यामुळे मतदार संख्या उद्दीष्टपूर्ती झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत नवीन नाव नोंदणी, नाव रद्द करणे, दुरूस्ती व स्थलांतर आदि स्वरुपाचे अर्ज भरुन घेण्यात आले. बाह्य मतदार संघासाठी ३०८ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी नवीन नाव नोंदणीचे १० हजार ८६३ अर्ज भरुन घेतले. मध्य मतदार संघासाठी १३ हजार ९११ नाव नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २२३ बीएलओंनी उद्दीष्टाच्या पुढे जाऊन २४ हजार ७७८ नवीन मतदारांची नोंदणी केली.
मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात नाव रद्द करण्याचे अर्ज १३२, दुरूस्ती अर्ज ६६५ तर स्थलांतरण अर्ज १८४ प्राप्त झाले तर मध्य विधानसभा मतदार संघात नाव रद्द करण्याचे २९, दुरूस्ती अर्ज २८९, स्थलांतरण अर्ज २०७ प्राप्त झाले होते. निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार जगदीश निकम, धमेंद्र मुल्हेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाºयांनी नाव नोंदणी व अर्जांची प्रक्रिया पार पाडली.