नाशिकमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ योजनेत यंदा ३५२ गावांची वाढ!

By vijay.more | Published: September 4, 2017 05:29 PM2017-09-04T17:29:49+5:302017-09-04T17:39:08+5:30

गणेशोत्सवात गावोगावच्या विविध मंडळांनी एकत्र येऊन एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा. शांततेला बाधा पोहोचू नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सहकार्याने व तंटामुक्ती समितीच्या सहाय्याने ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबवण्यात आली़ या योजनेला दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला.

352 villages increase in 'Ek Gaav, Ek Ganapati' scheme in Nashik | नाशिकमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ योजनेत यंदा ३५२ गावांची वाढ!

नाशिकमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ योजनेत यंदा ३५२ गावांची वाढ!

Next

नाशिक, दि. 4 -  गणेशोत्सवात गावोगावच्या विविध मंडळांनी एकत्र येऊन एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा. शांततेला बाधा पोहोचू नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सहकार्याने व तंटामुक्ती समितीच्या सहाय्याने ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबवण्यात आली़ या योजनेला दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला असून, तालुक्यातील १०२६ गावांनी यंदा ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबविली आहे. विशेष म्हणजे ही योजना राबविणाºया गांवामध्ये यंदा ३५२ ने वाढ झाली आहे़
गणेशोत्सव काळात शांततेला बाधा पोहचू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे तंटामुक्ती समितीचे सहाय्याने ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे गावागावांमध्ये शांतता स्थापित होऊन जातीय सलोखा निर्माण होण्यास चांगलीच मदत झाली आहे. तसेच या गणेशोत्सवात डीजेमुळे होणारे ध्वनिप्रदूषण तसेच मोठ्या आवाजामुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांना त्रास होऊ नये यासाठी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्फे शाळा-महाविद्यालयांमध्ये चित्रकला स्पर्धा, पथनाट्ये, प्रचार फेºया आयोजित करून जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
‘एक गाव, एक गणपती’ या योजनेंतर्गत उत्कृष्ट देखावे सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम व जातीय सलोखा ठेवून नियमांचे पालन करणाºया गणेश मंडळांना पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत.

या पोलीस ठाण्यांतील गावांमध्ये चांगला प्रतिसाद

ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेस काही पोलीस ठाण्यांतील गावांनी चांगला प्रतिसाद दिला आहे़ त्यामध्ये सटाणा पोलीस ठाण्यात एक गाव, एक गणपती या योजनेत यावर्षी ५४ गावांची वाढ झाली आहे़ तर पेठ (३८), एमआयडीसी (३३), येवला तालुका (२८), मालेगाव तालुका (२३), हरसूल (२०), बाºहे (२०), दिंडोरी (१६), नांदगाव (१५), सायखेडा (१४), जायखेडा (१४), सुरगाणा (११), वाडीवºहे (१०), घोटी (८), अभोणा (८), पिंपळगाव (८), वावी (६), देवळा (५), वडनेर खा. (५), ओझर (४), कळवण (४), मनमाड (४), चांदवड (२) तर लासलगाव व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका गावामध्ये एक गाव, एक गणपतीची भर पडली आहे़

या पोलीस ठाण्यांतील गावांमध्ये शून्य प्रतिसाद

पोलीस अधीक्षकांच्या ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेला मुस्लीम बहुल अशा मालेगाव शहर, आझादनगर, पवारवाडी, आयशानगर, रमजानपुरा, छावणी व मालेगाव कॅम्प या पोलीस ठाण्यांतील मंडळांनी शून्य प्रतिसाद दिला आहे़ सिन्नर पोलीस ठाण्यांतर्गत गतवर्षी ५१ गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली होती. मात्र यावर्षी केवळ ३० गावांतील मंडळांनी या योजनेत सहभाग घेतल्याने २१ ने घट झाली आहे़ याप्रमाणेच वडनेर भैरव (१४), नाशिक तालुका (४), वणी (२) तर इगतपुरी पोलीस ठाण्यात एकने घट झाली आहे़

६० गुन्हेगारांची तडीपारी

गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी नाशिक ग्रामीणमधील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ त्यामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असलेल्या १५८७ गुन्हेगारांना १०७ अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या़ तर ५ गुन्हेगारांना १०९ अन्वये, २१४ गुन्हेगारांना ११० अन्वये तर २ हजार ९८ गुन्हेगारांना १४९ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ याबरोबरच ६० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, मुंबई पोलीस कायदा कलम ९३ अन्वये ११९ गुन्हेगारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़

अध्यादेशातील समितीमुळे फायदाच

‘एक गाव, एक गणपती’ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यांतर्गत यंदा १०२६ गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली आहे़ या गावांमधील मंडळे एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करीत असून यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसून चांगले उपक्रम राबविण्यासाठी वाव मिळतो आहे़
- संजय दराडे, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
 

Web Title: 352 villages increase in 'Ek Gaav, Ek Ganapati' scheme in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.