नाशिक जिल्ह्यात ३५८ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:30 AM2021-03-10T01:30:41+5:302021-03-10T01:31:28+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग फैलावताना दिसत असून, प्रशासनाच्या वतीने निर्बंध कडक करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. ९) शहरात ४११, तर ग्रामीण भागात ७१, मालेगावात ४१ आणि जिल्ह्याबाहेरील १४ अशा ५३७ नव्या रुग्णांची भर पडली. ३५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग फैलावताना दिसत असून, प्रशासनाच्या वतीने निर्बंध कडक करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. ९) शहरात ४११, तर ग्रामीण भागात ७१, मालेगावात ४१ आणि जिल्ह्याबाहेरील १४ अशा ५३७ नव्या रुग्णांची भर पडली. ३५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
मंगळवारी दिवसभरात ४, तर मालेगावात २ आणि ग्रामीण भागातील ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतचा कोरोनाबाधितांचा मृत्यूचा आकडा २ हजार १४९ इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ लाख २७ हजार १०७वर पोहोचली आहे.