विकास संस्थेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी ३६ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2016 10:18 PM2016-06-15T22:18:32+5:302016-06-15T23:18:19+5:30
कुंदेवाडी : अनुसूचित जाती गटाची जागा बिनविरोध
सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. छाननी प्रक्रियेनंतर ११ जागांसाठी ३६ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत.
प्रभाकर पिंपळे हे नामकर्ण आवारे व कमलाकर पोटे गटाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. निवडणुकीत नामकर्ण आवारे, कमलाकर पोटे व विकास संस्थेचे अध्यक्ष राजाराम कुऱ्हाडे यांचे एक पॅनल व भाऊसाहेब नाठे, सुरेश कुऱ्हाडे यांचे विरोधी पॅनल अशी लढत होण्याची शक्यता आहे. माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.
छाननीनंतर कुंदेवाडी विकास संस्थेच्या निवडणुकीत शिल्लक राहिलेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गट- सुखदेव माळी, भास्कर नाठे, उद्धव माळी, रतन गोळेसर, हरिभाऊ नाठे, रंगनाथ माळी, रतन माळी, महिपत माळी, कचरू माळी, शिवा माळी, भगवान गोळेसर, राजाराम कुऱ्हाडे, मधुकर गोळेसर, भानुदास गोळेसर, रामदास पोटे, मुरलीधर नाठे, भास्कर नाठे, हिरामण माळी, राजेंद्र गांडोळे, मधुकर कुऱ्हाडे, साहेबराव नाठे (मोठा), शंकर आवारे, मधुकर नाठे, मुरलीधर बांडे.
महिला राखीव गट- हौशाबाई चव्हाणके, लक्ष्मी माळी, शोभा
माळी, सीता नाठे, लंका नाठे,
जिजा सोनवणे, किसना गोळेसर. इतर मागास प्रवर्ग- अशोक माळी, भाऊसाहेब नाठे, पोपट गोळेसर, रामभाऊ माळी व संजय माळी. माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल. (वार्ताहर)