जिल्ह्यात आठवडाभरात ३६२० बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:13+5:302021-03-09T04:18:13+5:30

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मार्च महिन्याच्या प्रारंभापासून प्रचंड वेगाने भर पडू लागली आहे. गत मंगळवारपासून बाधितांची संख्या सातत्याने पावणे ...

3620 affected in a week in the district | जिल्ह्यात आठवडाभरात ३६२० बाधित

जिल्ह्यात आठवडाभरात ३६२० बाधित

Next

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मार्च महिन्याच्या प्रारंभापासून प्रचंड वेगाने भर पडू लागली आहे. गत मंगळवारपासून बाधितांची संख्या सातत्याने पावणे चारशेवर राहिली आहे. २ मार्चला बाधित संख्येत ३८३ ची, ३ मार्चला ४१६, ४ मार्चला ५५८, ५ मार्चला ३८०, ६ मार्चला ६४५, ७ मार्चला ५६३ तर ८ मार्चला ६७५ नागरिक बाधित झाले आहेत. ८ मार्चला तर पाच महिन्यातील सर्वाधिक विक्रमी वाढीची नोंद झाली आहे.

इन्फो

उपचारार्थी रुग्ण संख्या ऑगस्टच्या पातळीवर

महानगरातील सक्रिय रुग्णांची संख्या गत १५ दिवसात वाढून दोन हजारांनी वाढून ३१५१ पर्यंत पोहोचली आहे. नाशिक शहरातील बाधितांच्या संख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडण्यास ऑगस्ट महिन्यात प्रारंभ केला होता. त्यानंतर बरोबर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

इन्फो

बरे हो‌ण्याच्या टक्केवारीतही घसरण

नवीन रुग्ण दाखल होण्याच्या तुलनेत कोरोनामुक्त अधिक असल्यास रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढत जाते; मात्र गत महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून बहुतांश वेळा नवीन रुग्णांची संख्या कोरोनामुक्तांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळेच गत महिन्याच्या प्रारंभी ९८ टक्क्यांपर्यंत पोहाेचलेली रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत ३ टक्क्यांनी घसरण होऊन ते प्रमाण ९५ टक्क्यांखाली म्हणजे ९४.९७ पर्यंत आले आहे.

इन्फो

आठवडाभरात ३१ बळी

२ मार्चपासूनच्या आठवडाभरात जिल्ह्यात एकूण ३१ बळी गेले आहेत. आठवडाभरात ३१ बळींची ही संख्यादेखील पाच महिन्यांनंतर आली असल्याने कोरोनाची पुन्हा दुसरी लाट येऊ नये, यासाठी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना पुन्हा दक्षतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

ग्राफ

सपकाळे साहेबांना ग्राफ सांगितला होता.

Web Title: 3620 affected in a week in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.