३७ वैमानिक देशसेवेत : लष्करी थाटात एव्हिएशन विंग प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:15 AM2018-05-13T00:15:29+5:302018-05-13T00:15:29+5:30

अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत कौशल्याचा वापर करत भारतीय सैन्यदलासाठी उत्कृष्ट योगदान द्यावे. लढाऊ वैमानिकापुढे आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णायक भूमिका बजावण्याचे आव्हान असते, त्यामुळे आपले महत्त्व ओळखून स्वत:ला सिद्ध करत अभिमानास्पद कामगिरी बजवावी, असा गुरुमंत्र ‘आर्मी एव्हिएशन विंग्ज’चे संचालक लेफ्टनंट जनरल कंवलकुमार यांनी दिला.

37 Airliner Country Service: Provided Army Thackeray Avenition Wing | ३७ वैमानिक देशसेवेत : लष्करी थाटात एव्हिएशन विंग प्रदान

३७ वैमानिक देशसेवेत : लष्करी थाटात एव्हिएशन विंग प्रदान

Next

नाशिक : अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत कौशल्याचा वापर करत भारतीय सैन्यदलासाठी उत्कृष्ट योगदान द्यावे. लढाऊ वैमानिकापुढे आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णायक भूमिका बजावण्याचे आव्हान असते, त्यामुळे आपले महत्त्व ओळखून स्वत:ला सिद्ध करत अभिमानास्पद कामगिरी बजवावी, असा गुरुमंत्र ‘आर्मी एव्हिएशन विंग्ज’चे संचालक लेफ्टनंट जनरल कंवलकुमार यांनी दिला. ‘हॅप्पी लॅण्डिंग’ या शब्दात देशसेवेत दाखल झालेल्या लढाऊ वैमानिकांना उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.  निमित्त होते गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ हेलिकॉप्टरच्या प्रशिक्षणार्थींच्या २९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे. शनिवारी (दि.१२) सैनिकी ब्रास बॅण्डच्या ‘कदम कदम बढाये जा...’च्या धूनवर ३७ प्रशिक्षणार्थी वैमानिकांनी उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार संचलन करत उपस्थित उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कंवलकुमार यांच्या हस्ते ३७ वैमानिकांसह लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांच्या प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाºया दहा अधिकाºयांना एव्हिएशन विंग, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  यावेळी कंवलकुमार पुढे म्हणाले, धाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक नेहमीच यशस्वी ठरतो. राष्टÑसेवेसाठी ‘एव्हिएशन स्कूल’च्या उत्कृष्ट अशा व्यासपीठावरून तुमचे भारतीय सैन्यदलात आगमन झाले आहे, त्याचा अभिमान बाळगावा. नव्या हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितरीत्या उड्डाण करत चोखपणे आपली कामगिरी बजवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी उपचारार्थ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ विमानचालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थी जवानांना देण्यात आले. या प्रशिक्षणार्थी जवानांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला.
‘आॅपरेशन विजय’मधून युद्धभूमीचा थरार
युद्धजन्य परिस्थितीमध्ये भूदलावरील जवानांना महत्त्वाची मदत देण्यासाठी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे कौशल्य अधोरेखित करण्यासाठी हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी ‘आॅपरेशन विजय’ची झलक उपस्थितांना दाखविण्यात आली. चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने युद्धभूमीवर तत्काळ पॅराशूटद्वारे उतरणाºया सैनिकांसह पोहचणारे जवान, चेतक द्वारे त्यांना पुरविण्यात आलेली रसद आणि शत्रूच्या छावण्यांवर सैनिक हल्ला चढवितात. अल्पवधीत शत्रूवर विजय मिळवून सैनिक आनंदाने तिरंगा फडकावून सलामी देतात. या आॅपरेशनमध्ये जखमी झालेल्या सैनिकांना पुन्हा ‘चेतक’द्वारे सुरक्षितरीत्या युद्धभूमीवरून हलविले जाते.
प्रशिक्षण दृष्टिक्षेपात
१८ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी वैमानिक लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे धडे घेतात. युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर वापराचे कसब, शत्रूवर हवाई हल्ल्याच्या वेळी हेलिकॉप्टरचा वापर, भूदलाला वेळोवेळी विविध आव्हानांचा सामना करत रसद पुरविणे, जखमी जवानांना युद्धभूमीवरून तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविणे अशा अनेकविध बाबींचा तंत्रशुद्ध अभ्यास करत प्रत्यक्षरीत्या सरावातून वैमानिक लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे प्रशिक्षण घेत असतात.
लष्करी थाटात ३७ वैमानिकांसह दहा प्रशिक्षकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र आर्मी एव्हिएशनचे संचालक अतिविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट कंवल कुमार यांनी प्रदान केले.  चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिकांनी रंगलेला ‘कॅट्स’चा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात पार पडला. वैमानिक प्रशिक्षण कालावधीत अष्टपैलू कामगिरी के ल्याबद्दल अभिषेक सिंग यांना सिल्व्हर चित्ता, तर उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून मेजर राज सिंग यांना गौरविण्यात आले.
यांचा झाला गौरव
उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींमध्ये कॅप्टन विवेक आनंद गुप्ता, कॅप्टन बी. के. रेड्डी, कॅप्टन दत्ता यांच्यासह एव्हिएशन प्रशिक्षक मेजर प्रियांक पुरी, मेजर निखिल टेटिया, उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून मेजर राज सिंग यांना गौरविण्यात आले. त्यांना सन्मानपूर्वक विविध स्मृतिचिन्ह व पदक प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी दिली जाणारी ‘सिल्व्हर चित्ता’ ट्रॉफी कॅप्टन अभिषेक सिंग यांनी मिळविली.

 

Web Title: 37 Airliner Country Service: Provided Army Thackeray Avenition Wing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.