सोसायटींतील ३७ लाखांचा अपहार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:04 AM2019-03-28T01:04:25+5:302019-03-28T01:04:49+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या कर्जवसुलीला काही ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना काही ठिकाणी मात्र या निमित्ताने बॅँकांच्या शाखांमध्ये तसेच विविध कार्यकारी सोसायटींमध्ये गैरप्रकार-देखील उघडकीस येऊ लागले आहेत.

 37 lakhs of frauds in the society exposed | सोसायटींतील ३७ लाखांचा अपहार उघडकीस

सोसायटींतील ३७ लाखांचा अपहार उघडकीस

Next

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या कर्जवसुलीला काही ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना काही ठिकाणी मात्र या निमित्ताने बॅँकांच्या शाखांमध्ये तसेच विविध कार्यकारी सोसायटींमध्ये गैरप्रकार-देखील उघडकीस येऊ लागले आहेत. सटाण्यामधील वीरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तपासणीत ३७ लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याला बँक प्रशासनाने पत्र दिले असून, लवकरच या संदर्भात गुन्हा दाखल होण्याची चिन्हे आहेत. बॅँकेच्या या पवित्र्यामुळे वि. का. संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा बँकेची सन २०१८-१९ मध्ये वसुलीस पात्र असलेली रक्कम २३३१ कोटी असून, त्यापैकी १९२१ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी बँकेने १ मार्चपासून धडक मोहीम सुरू केली आहे. सर्वाधिक थकबाकी असलेल्या दिंडोरी तालुक्यातील थकबाकीदार सभासदांची प्राप्त १०१ वसुली प्रमाणपत्राच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कर्जवसुली
करावी.
कर्ज न भरणाऱ्या सभासदांची शेतजमीन जप्त करून तिच्या लिलावाद्वारे वसुली करण्याचाही निर्णय बॅँकेने घेतला आहे. त्यादृष्टीने बँकेने कर्जवसुली मोहिमेंतर्गत जप्त केलेल्या मालमत्तांचे मूल्यांकन निश्चितीनंतर मालमत्तांची लिलाव प्रक्रियादेखील राबविली.  बँक प्रशासनाने वसुलीसाठी विविध कार्यकारी संंस्थांच्या तपासणीसाठी विशेष पथक तयार केले आहे. या पथकाने सटाणा तालुक्यातील वीरगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७ या पाच वर्षांच्या कालावधीतील संस्थेच्या व्यवहारांची तपासणी केली. या तपासणी कालावधीत ३७ लाखांचा अपहार झाल्याचे आढळून आले. तपासणी कालावधीत आढळून आलेल्या आर्थिक अनियमिततेस व गैरव्यवहारास संस्था चेअरमन, संचालक मंडळ व संस्था सचिव जबाबदार असल्याने संस्थेचे संचालक मंडळ व सचिव जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत शिफारस असलेला अहवाल बँकेला सादर झाला. या अहवालानुसार बँकेने संस्थेचे संचालक मंडळ व सचिव यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंबंधी तक्रार केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
११ लाखांची रक्कम जमा
मनमाड फळबाग व भाजीपाला खरेदी-विक्री संघाकडे ३९ लाख ९१ हजार थकबाकी वसुलीसाठी संस्थेची मालमत्ता विक्री केली. या विक्रीतून ११ लाख ११ हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

Web Title:  37 lakhs of frauds in the society exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.