कळवणमध्ये २७ ग्रामपंचायतींसाठी ३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 09:11 PM2021-01-05T21:11:38+5:302021-01-06T00:53:38+5:30

कळवण : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी भुसणी व तताणी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, सप्तशृंगगड, अभोणा, कनाशी, वडाळे (हातगड) ग्रामपंचायतीव्यतिरिक्त २३ ग्रामपंचायतींमधील ८४ जागा बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे. २९ ग्रामपंचायतींमधील ६०१ इच्छुकांपैकी ११८ इच्छुकांनी माघार घेतल्याने १०२ जागा बिनविरोध झाल्या असून, त्यात तताणी व भुसणी ग्रामपंचायतचा समावेश आहे. २७ ग्रामपंचायतींच्या १५९ जागांसाठी ३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

376 candidates are in the fray for 27 gram panchayats in Kalvan | कळवणमध्ये २७ ग्रामपंचायतींसाठी ३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात

कळवणमध्ये २७ ग्रामपंचायतींसाठी ३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात

Next
ठळक मुद्देअटतटीच्या लढती : भुसणी, तताणी ग्रामपंचायत बिनविरोध

बापखेडा ग्रामपंचायतच्या ८ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ८ जागा बिनविरोध झाल्या असून, ३ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. काठरे दिगर ग्रामपंचायतच्या ५ इच्छुकांनी माघार घेतली असून, १ जागा बिनविरोध झाली तर ८ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. मोहनदरी ग्रामपंचायतच्या २ जागा बिनविरोध झाल्या असून, ९ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. कनाशी ग्रामपंचायतच्या १५ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. नरूळ ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार घेतली असून ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता ६ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. बिलवाडी ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ४ जागा बिनविरोध झाल्या असून ३ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत.
मुळाने वणी ग्रामपंचायतच्या २ जागा बिनविरोध झाल्या असून ५ जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. देवळी वणी ग्रामपंचायतच्या एका इच्छुकाने माघार घेतली असून ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ४ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत. बोरदैवत ग्रामपंचायतच्या ६ इच्छुकांनी माघार नोंदवली असून, ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. ओझर ग्रामपंचायतच्या ४ इच्छुकांनी माघार नोंदवली असून, १ जागा बिनविरोध झाली आहे. ६ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. पळसदर ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार नोंदवली असून १ जागा बिनविरोध झाली आहे. ८ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. भगुर्डी ग्रामपंचायतच्या ४ इच्छुकांनी माघार घेतली असून, ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. २ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत.
सावकीपाळे ग्रामपंचायतच्या एका इच्छुकाने माघार घेतली तर २ जागा बिनविरोध झाल्या असून ५ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहे. लिंगामा ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार नोंदवली असून, ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ६ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. वडाळे हातगड ग्रामपंचायतच्या एका इच्छुकाने माघार घेतली. ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत.
अभोण्यात ३३ उमेदवार
अभोणा ग्रामपंचायतच्या २३ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने १३ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात आहेत. कुंडाणे (क) ग्रामपंचायतच्या ८ इच्छुकांनी माघार घेतल्याने ८ जागा बिनविरोध झाल्या असून, १ जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. जामले वणी ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार घेतल्याने ९ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. वीरशेत ग्रामपंचायतच्या ८ जागा बिनविरोध झाल्या असून, १ जागेसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत.
सप्तशृंगगडावर चुरस
सप्तशृंगगड ग्रामपंचायतच्या ७ इच्छुकांनी माघार घेतली, तर ९ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. नांदुरी ग्रामपंचायतच्या ५ इच्छुकांनी माघार घेतली असून २ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. गोसराणे ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ६ जागा बिनविरोध झाल्या असून, ३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहे. भुसणी ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार घेतल्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, कळमथे ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार घेतली आहे. ३ जागा बिनविरोध झाल्या असून ४ जागांसाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: 376 candidates are in the fray for 27 gram panchayats in Kalvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.