खटले जिल्'ात ३७८ सोनोग्राफी स :
By Admin | Published: December 8, 2014 12:54 AM2014-12-08T00:54:29+5:302014-12-08T00:55:28+5:30
३७८ सोनोग्राफी केद्रांपैकी ११ केंद्रांविरोधात न्यायालयात गर्भवती सेंटर्महिलांनी एमसीटीसीएसची नोंद करण्याची आवश्यकता
नाशिक : पीसीपीडीएनटी कायद्यानुसार काम न करणाऱ्या जिल्'ातील ३७८ सोनोग्राफी केंद्रांपैकी ११ केंद्रांवर न्यायालयात खटले सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी दिली आहे़ बॉर्डरवर असलेल्या गावांमधून मोठ्या संख्येने महिला गर्भलिंग तपासणीसाठी शेजारच्या राज्यात जात असल्याची माहिती असून, यास प्रतिबंध घालण्यासाठी तसेच जिल्'ातील सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंगनिदान तपासणी केली जाऊ नये यासाठी धडक तपासणी मोहीम राबविली जात असल्याची माहितीही माले यांनी दिली़ या मोहिमेबाबत माहिती देताना माले म्हणाले की, एक हजार पुरुषांमागे ९४२ महिला हे उत्तम मानले जाते़ मात्र देशात हे प्रमाण ९१३, तर महाराष्ट्रात ८८८ आहे़ हे प्रमाण कमी झाल्यास स्त्रिया व मुलींवर अत्याचार, तसेच विवाहास वधू न मिळते याबरोबरच सामाजिक नुकसान होते़ गर्भवती महिलेची व तिच्या बाळाच्या प्रकृतीची माहिती मिळावी या उद्देशासाठी विकसित करण्यात आलेल्या सोनोग्राफी तंत्राचा गैरवापर करून गर्भवती महिलेच्या पोटात मुलगा आहे की मुलगी हे पाहण्याचा उद्योग काही सेंटर्समार्फत केला जात होता़ यामुळे मुलींचे प्रमाण झपाट्याने कमी झाले होते़