३१ जागांसाठी ३८१ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:33 AM2018-06-07T00:33:15+5:302018-06-07T00:33:15+5:30

ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी १५ जून रोजी होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीअखेर एकूण ३८१ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी एस.एस. सोनवणे, सहायक अधिकारी जयचंद नायर व अनिकेत बोरकर यांनी दिली.

381 candidates for 31 seats | ३१ जागांसाठी ३८१ उमेदवार

३१ जागांसाठी ३८१ उमेदवार

Next
ठळक मुद्देनिवडणूक : एचएएल कामगार संघटना

ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी १५ जून रोजी होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीअखेर एकूण ३८१ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी एस.एस. सोनवणे, सहायक अधिकारी जयचंद नायर व अनिकेत बोरकर यांनी दिली.
कामगार संघटनेच्या अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी २८ अर्ज, उपाध्यक्षपदाच्या ४ जागांसाठी ७५ उमेदवारी अर्ज, सरचिटणीसपदाच्या एका जागेसाठी १६, सहचिटणीसपदाच्या ४ जागांसाठी ७१ अर्ज, खजिनदारपदाच्या एका जागेसाठी १५ अर्ज व कार्यकारिणी सदस्यपदाच्या २० जागांसाठी १७६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे एकूण ३१ जागांसाठी ३८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, उमेदवारी अर्जाची छाननी होऊन दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाच्या नावांची यादी ७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करणाºया इच्छुक उमेदवारांमध्ये संघटनेच्या आजी-माजी पदाधिकाºयांचा समावेश असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह येऊन शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, इच्छुकांची लक्षणीय संख्या पाहता पाच पॅनल होतील असा अंदाज वर्तिवला जात आहे.

Web Title: 381 candidates for 31 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.