दोन फेऱ्यांमध्ये ३ हजार ३८१ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:48 AM2018-05-20T00:48:02+5:302018-05-20T00:48:02+5:30
आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित जागांसाठी ४ जूननंतर तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे.
नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित जागांसाठी ४ जूननंतर तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी आतापर्यंत रिक्त असलेल्या जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळवून देऊ इच्छिणाºया पालकांना २६ मे ते ४ जून या कालावधीत अर्ज करण्याची संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनाच या मुदतीत अर्ज करता येणार असून, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नसल्याचे राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णय व परिपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी ४ जूननंतर तिसरी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पहिल्या सोडतीत निवड झालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांपैकी २१८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर दुसºया फेरीसाठी रिक्त जागांच्या प्रवेशाकरिता एक ते तीन किमी अंतरासाठी सोडत जाहीर झाली. त्यात १९०२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. यापैकी केवळ ११९९ विद्यार्थ्यांचेच प्रवेश दुसºया फेरीत निश्चित झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत पहिल्या फेरीतील २१८२ आणि दुसºया फेरीतील १११९ असे एकूण ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.
तीन हजार दोनशे जागा रिक्त
आरटीईअंतर्गत राखीव असलेल्या सहा हजार ५८९ जागांपैकी अजूनही तीन हजार २०८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आतापर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज दाखल केलेले नाही त्यांनी २६ मे ते ४ जून या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.