थेट सरपंचपदासाठी ३९ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:32 PM2017-09-28T23:32:58+5:302017-09-29T00:10:04+5:30
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी बुधवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. १२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या रिंगणातून ७९ पैकी ४० इच्छुकांनी माघार घेतली.
सिन्नर : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी बुधवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. १२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या रिंगणातून ७९ पैकी ४० इच्छुकांनी माघार घेतली. त्यामुळे १२ ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत ३९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर सदस्यपदाच्या १२० जागांसाठी आलेल्या ३२३ उमेदवारी अर्जापैकी ९१ जणांनी माघार घेतली. त्यामुळे २२ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
तालुक्यातील आशापूर (टेंभूरवाडी), डुबेरवाडी (कृष्णनगर), कीर्तांगळी, कारवाडी, शास्त्रीनगर (लोणारवाडी), नांदूरशिंगोटे, पाटपिंप्री, शहा, सायाळे, ठाणगाव, उजनी, वडगावपिंगळा या १२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची व १२० सदस्यपदासाठी निवडणूक होत आहे.
आशापूर (टेंभूरवाडी) येथील सरपंचपद सर्वसाधारण असून त्यासाठी ५ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यात एकाने माघार घेतल्याने सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर सदस्यपदाच्या ७ जागांसाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सदस्य पदासाठी पाच जणांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार रिंगणात आहे. ३ जागा बिनविरोध झाल्या. डुबेरवाडी (कृष्णनगर) चे सरपंचपद इतर मागास वर्गीय महिलेसाठी राखीव असून सरपंचपदासाठी ५ तर सदस्यपदाच्या ९ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सरपंचपदासाठी दोघांनी माघार घेतली. त्यामुळे तीन उमेदवार रिंगणात आहेत. तर सदस्यपदासाठी पाच जणांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार रिंगणात आहेत. ६ जागा बिनविरोध झाल्या. कीर्तांगळीचे सरपंचपद सर्वसाधारण असून सरपंचपदासाठी ८ तर सदस्यपदाच्या २२ अर्ज आले होते. सरपंच व सदस्यपदासाठी प्रत्येकी ४ जणांनी माघार घेतली. सरपंच पदासाठी ४ तर सदस्य पदासाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत. कीर्तांगळी ग्रामपंचायतीच्या २ सदस्य पदाच्या जागा बिनविरोध झाल्या. कारवाडीचे सरपंचपद सर्वसाधारण असून सरपंचपदासाठी ८ तर सदस्यपदाच्या ७ जागांसाठी १८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते.