राज्यभरातून ३ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी दिली सीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:49 AM2019-05-15T00:49:04+5:302019-05-15T00:50:03+5:30
राज्य सामायिक परीक्षा विभागातर्फे राज्यभरात २ ते १३ मे दरम्यान घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ९२ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी सीईटी दिली.
नाशिक : राज्य सामायिक परीक्षा विभागातर्फे राज्यभरात २ ते १३ मे दरम्यान घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ९२ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी सीईटी दिली. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण विद्यार्थ्यांपैकी ५.०६ टक्के म्हणजेच २० हजार ९३१ विद्यार्थी अनुपस्थित होते, तर सुमारे ३ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी त्यांचे हॉस तिकीटच संकेतस्थळावरून डाउनलोड केले नसल्याची माहिती राज्य सामायिक सीईटी विभागातर्फे देण्यात आली आहे. राज्यभरात २ मेपासून १३ मेपर्यंत झालेल्या सकाळ आणि दुपार अशा वेगवेगळ्या १९ सत्रांंमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित गटातील व भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह जीवशास्त्र विषयांची परीक्षा झाली.