येवल्यातील ४ बाधित कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 06:59 PM2020-09-18T18:59:16+5:302020-09-18T19:00:09+5:30
येवला : शहरासह तालुक्यातील ४ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. निमगाव मढ येथील ६५ वर्षीय बाधित पुरूषाचा नाशिक जिल्हा रूग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर चौघांचे रॅपीड अँटीजेन टेस्ट अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. दरम्यान आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या ३२ संशयितांचे स्वॅब अहवालाची प्रतिक्षा आहे.
लोकमत न्युज नेटवर्क

बाधितांमध्ये शहरातील मेनरोड, परदेशपुरा, पाटीलवाडा, बाजीराव नगर येथील रूग्णांचा समावेश आहे. जिल्हा रूग्णालयातून १ तर होम कोरंटाईन असलेले ३ असे एकूण ४ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ६०८ झाली असून आजपर्यंत ४७७ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ४१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ९५ असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.