व्यावसायिकांना घातला ४ कोटींना गंडा, संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:47 AM2022-09-19T06:47:43+5:302022-09-19T06:48:09+5:30

कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

4 Crores were cheated by businessmen, a case was registered against the directors | व्यावसायिकांना घातला ४ कोटींना गंडा, संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

व्यावसायिकांना घातला ४ कोटींना गंडा, संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जादा नफ्याचे आमिष दाखवून औरंगाबादच्या आठ व्यावसायिकांना मेन रोडवरील एका मोबाइल डिलर्सकडून सुमारे चार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस  आला आहे. या प्रकरणी औरंगाबादचे व्यावसायिक आदित्य राधेश्याम मालीवाल यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित डिलर्सविरुद्ध फिर्याद दिली आहे. यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

मेन रोडवरील वावरे लेनमधील  ईगल इलेक्ट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि.चे संचालकांविरुद्ध मालीवाल यांनी फिर्याद दिली आहे. औरंगाबादच्या व्यावसायिकांना ई-मेलद्वारे जादा नफ्याचे आमिष दाखविले व लाखो रुपये उकळले; संशयिताने या बदल्यात कुठल्याही प्रकारच्या मोबाइलचा पुरवठा केला नाही. संबंधित मोबाइल कंपनीच्या मुख्य डिलर्सकडे चौकशी केली असता, ही बाब उघड झाली. मोबाइलच्या मालाचा पुरवठा करण्यासाठी संशयित व्यावसायिक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकिसन खेमानी आणि कंपनीचे व्यवस्थापक श्रीनाथ अहिरवाडकर यांनी आगाऊ रक्कम व्यावसायिकांकडून घेतली. ऑगस्ट महिन्यात मोबाइलचा माल पुरविला नाही, तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली. व्यावसायिकांनी मोबाइल कंपनीकडे  चौकशी केली असता, त्यांनी ही कंपनी आता आमची अधिकृत विभागीय वितरक नसल्याचे सांगितले.

बनावट ई-मेलद्वारे फसवणूक
संशयित खेमानी यांनी मालीवाल यांना अधिक नफ्याचे आमिष दाखवून  ‘सुपरमनी’ कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यासाठी त्यांना ३५ लाखांची मर्यादा ठरवून दिली. १ जुलै, २०२२ रोजी खेमानी  यांनी मालीवाल यांच्या संमती न घेता, १२ लाख ६४ हजार ७५४, १० लाख ५१ हजार १८१, आणि १० लाख ८४ हजार ०६५ रुपये कंपनीच्या बँक खात्यामधून अन्य खात्यात वर्ग करून घेतले. 

नवीन ‘स्कीम’ सांगून ७० लाख
संशयित खेमानी यांना मालीवाल यांनी रक्कम का खात्यातून वर्ग केली, असे विचारले असता, त्यांनी नवीन ‘स्कीम’ येणार आहे, त्यासाठी ८० ते ९० लाखांची गुंतवणूक करा, यापेक्षाही जास्त नफा होईल, असे सांगितले. मालीवाल यांनीही आमिषापोटी स्वत:च्या खात्यात ७० लाख ८  हजार रुपये भरणा केला.

Web Title: 4 Crores were cheated by businessmen, a case was registered against the directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.