नाशिकला मिळाल्या आणखी ४ शिवशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:47 PM2017-12-02T12:47:16+5:302017-12-02T12:47:51+5:30
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य घेऊन वाटचाल करणाºया एसटी महामंडळाच्या नाशिक आगाराच्या ताफ्यात आणखी ४ शिवशाही दाखल झाल्या
नाशिक- प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य घेऊन वाटचाल करणाºया एसटी महामंडळाच्या नाशिक आगाराच्या ताफ्यात आणखी ४ शिवशाही दाखल झाल्या असून त्या उद्यापासून (दि.३) नाशिक-बोरिवली या मार्गावर धावणार आहेत. आता नाशिकच्या ताफ्यात आधुनिक बनावटीच्या, अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज अशा २१ शिवशाही बसेस आल्या असून त्यातील १६ बसेस नाशिक-पुणे मार्गावर धावत आहेत. १ बस नाशिक-मंत्रालय या मार्गावर असून नव्याने दाखल झालेल्या या बस बोरीवलीसाठी वापरण्यात येणार आहेत. बोरीवलीसाठी नाशिकहून पहाटे ५.३०वा., ६.३०वा., ७.३०वा, ८.३०वा., दुपारी २.३०वा, ३.३०वा., ४.४५वा. या वेळांवर महामार्ग बसस्थानकातुन बस धावणार असून बेरीवलीहून नाशिकला येण्यासाठी दुपारी १.४५वा., २.४०वा., ३.४०वा., ४.४०वा., १०.५०वा., ११.५०वा., १२.५०वा. या वेळांवर प्रवाशांना उपलब्ध होतील. या बसाचा मार्ग नाशिक महामार्ग बसस्थानक- पाथर्डीफाटा-खर्डी-शहापुर-सुकुरबावडी मार्गे बोरीवली असा असेल. बसमध्ये पूर्णपणे वातानुकूलित, लगेज स्पेस, सीसीटीव्ही कॅमेरे, महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, डिजिटल घड्याळ, चार्जिंग सॉकेट, आरामदायी प्रवास, वैशिष्टयपुर्ण रचना, अंतर्गत सोयीसूविधा आणि किफायतशीर दर यामुळे नाशिक-पुणे शिवशाहीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. तोट्याचे कारण देत कमी केलेल्या बसफेºया, मनपा-एसटी प्रशासनात बससेवेवरुन सुरु असलेला वाद, खाजगी वाहतुकीद्वारे प्रवाशांची होत असलेली आर्थिक लुट यामुळे नाशिककरांना शहर बससेवेच्या बाबतीत गैरसोय सहन करावी लागत असताना शहरातुन पुण्या-मुंबईला जाणाºया प्रवाशांसाठी मात्र महामंडळाने पायघड्या घातल्याचे चित्र दिसून येत आहेत.