५७ कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:30 PM2020-03-26T23:30:40+5:302020-03-26T23:31:15+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील छोट्या गुन्ह्यातील ५७ कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर गेल्या तीन दिवसात सोडण्यात आले. दरम्यान, कारागृहातून जिल्हा रुग्णालय, बँका, कंपन्या, विविध शासकीय कार्यालय यांना आतापर्यंत १५ हजार मास्क बनवून देण्यात आले.
नाशिकरोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील छोट्या गुन्ह्यातील ५७ कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर गेल्या तीन दिवसात सोडण्यात आले. दरम्यान, कारागृहातून जिल्हा रुग्णालय, बँका, कंपन्या, विविध शासकीय कार्यालय यांना आतापर्यंत १५ हजार मास्क बनवून देण्यात आले.
गुरु वारी (दि. २६) कारागृहामध्ये मोठ्या गुन्ह्यातील काही कैद्यांनी कोरोना व्हायरसचा फायदा उचलत आम्हालाही जामिनावर सोडावे, याकरिता कैद्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र कारागृह प्रशासनाने सर्व कैद्यांची समजूत घातली. धुळ्याच्या एका खुनाच्या आरोपातील सर्व संशयिताना कारागृह वेगवेगळे ठेवण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी कोरोनामुळे मास्कची टंचाई निर्माण झाल्याने कैद्यांनी आतापर्यंत आठ दिवसात १५ हजार मास्क बनवून विविध बँका, छोटे खुले कारागृह, जिल्हा रुग्णालय, संदर्भ रु ग्णालय, महावितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, खासगी कंपन्या यांना दिले आहेत. कारागृहात दररोज बाराशे ते पंधराशे मास्क तयार केले जातात. कारागृह कारागृहाकडे अजून ८० हजार मास्क बनवून देण्याची मागणी नोंदवण्यात आली आहे. जीएसटीसह पंधरा रुपयात एक मास्क दिला जात असल्याचे कारागृह कारखाना विभाग प्रमुख पल्लवी कदम यांनी सांगितले. कारागृहामध्ये कामावर
येणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी कैदी यांची थर्मामीटरद्वारे
तपासणी करूनच आतमध्ये सोडले जात आहे.