आरटीईअंतर्गत ४ हजार ६११ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 01:28 AM2018-08-12T01:28:39+5:302018-08-12T01:29:02+5:30
आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी शिक्षणाच्या कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये एकूण ४ हजार ६११ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले
नाशिक : आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी शिक्षणाच्या कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये एकूण ४ हजार ६११ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, शनिवार (दि.११) पासून पाचवी फेरी सुरू झाली आहे. या फेरीत १४६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २० आॅगस्टपर्यंत प्रवेशाची प्रक्रियापूर्ण करावी लागणार आहे.
शिक्षण विभागातर्फे यावर्षी राबविण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत एकूण ११ हजार ११८ विद्यार्थ्यांनचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी चार हजार ६११ विद्यार्थ्यांना आतापर्यंत विविध शाळांमध्ये प्रवेश मिळाले आहेत. चौथ्या फेरीत ३५४ पैकी केवळ १५८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. त्यानंतर उर्वरित १४६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली.