घोटीत २० वर्षीय युवकाचा किरकोळ कारणावरून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:38 PM2020-02-16T18:38:04+5:302020-02-16T18:41:31+5:30

घोटी : येथे किरकोळ कारणावरून एका २० वर्षीय युवकाचा चार ते पाच जणांनी घोटी येथे सुरु असलेल्या डांगी प्रदर्शनात खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र चारच तासात घोटी पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात देखील घेतले आहे.

4-year-old boy murdered for minor reasons | घोटीत २० वर्षीय युवकाचा किरकोळ कारणावरून खून

घोटीत २० वर्षीय युवकाचा किरकोळ कारणावरून खून

Next
ठळक मुद्दे पाच दिवसांपूर्वी एका हॉटेल मध्ये जेवण करत असतानाच त्यांच्यात वाद झाला होता

घोटी : येथे किरकोळ कारणावरून एका २० वर्षीय युवकाचा चार ते पाच जणांनी घोटी येथे सुरु असलेल्या डांगी प्रदर्शनात खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र चारच तासात घोटी पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात देखील घेतले आहे.
घोटीतील डांगी संकरित जनावरांच्या प्रदर्शनात देवळे (ता. इगतपुरी) येथील युवकाचा शनिवारी (दि.१५) रात्री १० वाजेच्या सुमारास खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
इगतपुरी तालुक्यातील देवळे येथील विनोद मच्छींद्र तोकडे (२०) हा आपल्या मित्रांसोबत घोटी येथे डांगी जनावरांचे प्रदर्शन पाहण्यासाठी आला होता.
दरम्यान यावेळी माणिकखांब (दि.१५) रोजी येथील संशयित आरोपी सागर गोविंद चव्हाण, रामदास बाळू चव्हाण (१९), अनिकेत अंबादास चव्हाण (२०), रवींद्र बाळू चव्हाण (१९), आकाश ज्ञानदेव चव्हाण (२०), जगन राज चव्हाण (१९), अमोल रामदास चव्हाण (२०) यांनी मयत विनोद तोकडे याच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मार करून खाली पाडले. त्यांनतर लाथाबुक्यांनी मारहाण करत पोटात चाकूने वार केले.
अत्यंत कृर पद्धतीने पोटात वार केल्याने मच्छिंद्र तोकडे मयत झाला. खुनाची घटना घडताच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी पळ काढला.
संशयित आरोपी खून करून फरार होत असतांना घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या पथकाने अवघ्या चार तासातच आरोपींना ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर संशयित आरोपी व मयत गेल्या चार पाच दिवसांपूर्वी एका हॉटेल मध्ये जेवण करत असतानाच त्यांच्यात वाद झाला होता. त्या भांडणाचा काट धरून त्यांनी हे कृत्य केल्याचे समजते.
थेट खून करण्याचे धाडस त्यांनी केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने मनोरंजन कार्यक्र म व दुकाने बंद केली. नागरिकांना शांततेचे आवाहन करत आरोपींना पोलीस ठाण्यात आणत मध्यरात्री आठ जणांविरु द्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान या घटनेचा अधिक तपास सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धुमसे, हवालदार बिपिन जगताप, विश्वास पाटील, अशोक कोरडे, भास्कर शेळके, शितल गायकवाड, संतोष दोंदे, भास्कर महाले, लहू सानप, रमेश चव्हाण, प्रकाश कासार, शरद कोठुळे, रामकृष्ण लहामटे यांनी संशयितांना ताब्यात घेतले.

Web Title: 4-year-old boy murdered for minor reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.