४० वैमानिक देशसेवेत : लष्करी थाटात ‘कॅट्स’चा दिक्षांत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 08:31 PM2018-11-10T20:31:36+5:302018-11-10T20:32:51+5:30

नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

 40 air travel services: Cats' cemetery ceremony in the military | ४० वैमानिक देशसेवेत : लष्करी थाटात ‘कॅट्स’चा दिक्षांत सोहळा

४० वैमानिक देशसेवेत : लष्करी थाटात ‘कॅट्स’चा दिक्षांत सोहळा

Next
ठळक मुद्दे३० व्या तुकडीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण सुरक्षित उड्डाण हेच उत्कृष्ट वैमानिकाचे ध्येय

नाशिक : भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची ३० वी तुकडी देशसेवेत शनिवारी (दि. १०) दाखल झाली. नाशिकमधील गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’चा (कॅट्स) दीक्षांत सोहळ्यात ४० वैमानिकांना स्कूलचे कमान्डण्ट ब्रिगेडियर सरबजितसिंग भल्ला यांच्या हस्ते ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करुन गौरविण्यात आले.
नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ३० व्या तुकडीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने ४०  वैमानिक देशसेवेसाठी विविध ठिकाणी सेवा देण्यास सज्ज झाले आहेत. दरम्यान, भारतीय भूदलातून दोन, तर भारतीय नौसेनेमधील एक अशा तीन अधिकाºयांनी लढाऊ हेलिकॉप्टरचालनाच्या प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल भल्ला यांनी या अधिकाºयांना प्रशिक्षकपदाचा ‘बॅच’ प्रदान करून गौरव केला.
युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षितपणे उपचारार्थ तत्काळ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ विमानचालनाचे प्रशिक्षण सुमारे वर्षभराच्या कालावधीत या केंद्रातून प्रशिक्षणार्थी जवानांना देण्यात आले. जवानांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी लष्करी थाटात ४० वैमानिकांसह तीन प्रशिक्षकांना ‘एव्हिएशन विंग’ व ‘प्रमाणपत्र’ देण्यात आले.
चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने व चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिकांनी रंगलेला ‘कॅट्स’चा दीक्षांत सोहळा उगवत्या दिनकराच्या साक्षीने पार पडला. सैनिकी ब्रास बॅण्ड पथकाच्या विविध सुरांच्या तालावर प्रशिक्षणार्थी जवानांनी परेड सादर करत उपस्थित लष्करी अधिकारी वर्गाला मानवंंदना दिली.

सुरक्षित उड्डाण हेच उत्कृष्ट वैमानिकाचे ध्येय
धाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक यशस्वी होतो.‘एव्हिएशन स्कूल’च्या उत्तम व्यासपीठावरुन तुम्ही सेवेत दाखल झाले आहात त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्यपूर्ण कामगिरीवर भर द्या, असा गुरुमंत्र सरबजितसिंग भल्ला यांनी यावेळी दिला. सुरक्षित उड्डाण करत लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न कारकिर्दीत करावा. शारीरिक व मानसिक आरोग्य एका उत्कृष्ट लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकासाठी आवश्यक ठरते हे विसरून चालणार नाही. धाडस, प्रामाणिकपणा, त्याग व समर्पण या मूल्यांची शिकवण सदैव स्मरणात ठेवून आपल्या कामगिरीतून देशाचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहनही भल्ला यांनी यावेळी केले.

Web Title:  40 air travel services: Cats' cemetery ceremony in the military

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.