४० टक्के तरुण ‘ब्रेन स्ट्रोक’चे बळी !

By admin | Published: October 28, 2016 11:16 PM2016-10-28T23:16:10+5:302016-10-28T23:17:34+5:30

४० टक्के तरुण ‘ब्रेन स्ट्रोक’चे बळी !

40 percent of young 'brain stroke' victims! | ४० टक्के तरुण ‘ब्रेन स्ट्रोक’चे बळी !

४० टक्के तरुण ‘ब्रेन स्ट्रोक’चे बळी !

Next

अझहर शेख  नाशिक
तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेले किंवा तारुण्यावस्थेत आलेला मुलामुलींना ज्याप्रमाणे हृदयरोगाचा धोका आहे. त्याचप्रमाणे ‘ब्रेन स्ट्रोक’चाही धोका आहे. जिल्ह्यातील पक्षघाताच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ४० टक्के रुग्ण तरुणवयातील असल्याचा दावा तज्ज्ञांचा आहे. मानसिक ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि व्यसनाधीनता ही यामागची मुख्य कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे
हृदयरोग आणि पक्षघात यांची कारणे जवळपास सारखी आहे. रक्तामध्ये गाठी होऊन त्या गाठी ज्या अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतील त्या अवयवांना धोका उद्भवतो. रक्तात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर गुठळ्या तयार होतात सर्वसाधारणपणे या गुठळ्या ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तामध्ये जास्त आढळतात त्यामुळे ह्रदयरोग होतो; मात्र जेव्हा या गुठल्या मोठ्या किंवा लहान मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये येतात तेव्हा मेंदूला झटका (ब्रेन स्ट्रोक) बसतो आणि पक्षघात (पॅरेलिसीस) होतो. मानसिक ताणतणावामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्तात गाठी होण्याची शक्यता निर्माण होते. गुटखा, तंबाखू, सिगारेटचे सेवन व मद्यप्राशनामुळे रक्तवाहिन्यांचा आकार कमी होऊन त्या आकुंचन पावण्यास सुरूवात होते. यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊन गाठी जास्त लवकर तयार होतात, असे मेंदूविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  शहरात गेल्या पाच वर्षांमध्ये ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका अधिक वाढला आहे. दरवर्षी शहराच्या एकू ण लोकसंख्येमागे शंभर ते दोनशे नागरिकांना पक्षघाताच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस तरुण वयात हा आजार अधिक फोफावत असल्याचे मेंदूविकार तज्ज्ञांचे मत आहे.
काय आहे ‘ब्रेन स्ट्रोक’
‘ब्रेन स्ट्रोक’ अर्थात पक्षघात. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन मेंदूला झटका बसतो. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठल्याने किंवा रक्तस्त्राव तसेच रक्तवाहिन्यांना तडा गेल्याने स्ट्रोकसारखा आजार उद्भवतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. मनुष्य अधिक कालावधीसाठी बेशुद्धावस्थेतही जाऊ शकतो. वेळीच योग्य निदान व उपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यूही होण्याची शक्यता असते.
उत्तम आहार, नियमित व्यायाम केल्यास ‘स्ट्रोक’पासून सुरक्षित राहता येऊ शकते. याबरोबरच तरुणाईने फास्ट-जंक फूड, मद्यप्राशन, धूम्रपान करणे कटाक्षाने टाळावे. मानसिक तणावापासून स्वत:ला दूर ठेवावे.
- डॉ. धनंजय डुबेरकर

Web Title: 40 percent of young 'brain stroke' victims!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.