भोजापूर धरणात ४० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:13+5:302021-04-07T04:14:13+5:30

भोजापूरसह पाच धरणात मार्च अखेरपर्यंत ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यात यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही. शिवाय भोजापूर ...

40% water storage in Bhojapur dam | भोजापूर धरणात ४० टक्के पाणीसाठा

भोजापूर धरणात ४० टक्के पाणीसाठा

Next

भोजापूरसह पाच धरणात मार्च अखेरपर्यंत ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यात यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही. शिवाय भोजापूर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडणेही शक्य आहे. भोजापूर, ठाणगाव, कोनांबे, बोरखिंड धरणात गतवर्षींच्या तुलनेत १४ टक्के जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त पाऊस झाला. अखेरच्या टप्प्यापर्यंत झालेला दमदार पाऊस, दर महिन्याला होणारी अवकाळी पावसाची हजेरी याचा परिणाम म्हणून धरणातील पाणीसाठा चांगल्या प्रमाणात टिकून आहे. धरणाच्या निर्मितीनंतर मार्च अखेरपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावाही पाटबंधारे विभागाने केला आहे.

मनेगावसह १६, कणकोरी व ५ गावे, ठाणगावसह पाच गावे, त्याचप्रमाणे बोरखिंड धरणावर आधारित नळ पाणी योजनांकरिता पुरेसा उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. किमान तीन महिने योजना पूर्ण क्षमतेने सुरू राहू शकतील. त्यामुळे यंदा तालुक्याला पाणीटंचाईची भीती नाही. २०२० ला मार्च अखेरपर्यंत धरणात २१ टक्के पाणीसाठा होता. यंदा २०७ दशलक्ष घनफूट (३५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. २०१९ ला अवघा २५ दशलक्ष घनफूट म्हणजेच ४.३ टक्के साठा शिल्लक होता. तर २०१८ ला चार टक्के साठा होता. २०१७ ला भीषण दुष्काळी परिस्थिती होती. मार्च अखेरपर्यंत केवळ तीन टक्के साठा शिल्लक असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ झाली होती.

फोटो ओळी : भोजापूर धरणाचा संग्रहीत फोटो.

Web Title: 40% water storage in Bhojapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.