दारणात 400 एमसीएफटी साठा पडून, तरी पाणीकपातीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 01:20 AM2021-05-03T01:20:24+5:302021-05-03T01:21:30+5:30
शहरासाठी यंदा परिसरातील तीन धरणांमधून मुबलक पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले असले तरी दारणा धरणातून गेल्या चार महिन्यांपासून पाणी उचलणे राजकीय दबावामुळे बंद असून, त्याचा भार गंगापूर धरणावर आला आहे. अशावेळीक आरक्षणापेक्षा सुमारे दाेनशे दशलक्ष घनफूट पाणी या धरणातून उचलावे लागणार असल्याने तातडीने पाणीकपात करण्याची शिफारस पाणीपुरवठा विभागाने केली आहे. त्यामुळे लवकरच नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
नाशिक : शहरासाठी यंदा परिसरातील तीन धरणांमधून मुबलक पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले असले तरी दारणा धरणातून गेल्या चार महिन्यांपासून पाणी उचलणे राजकीय दबावामुळे बंद असून, त्याचा भार गंगापूर धरणावर आला आहे. अशावेळीक आरक्षणापेक्षा सुमारे दाेनशे दशलक्ष घनफूट पाणी या धरणातून उचलावे लागणार असल्याने तातडीने पाणीकपात करण्याची शिफारस पाणीपुरवठा विभागाने केली आहे. त्यामुळे लवकरच नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
शहरासाठी गंगापूर धरणातून ३८०० दशलक्ष घनफूट, दारणामधून ४०० तर मुकणे धरणातून १३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित देण्यात आले आहे. मात्र, गेल्यावर्षी चेहेडी धरणातून पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण झाल्या. भगूर, देवळाली कॅम्प परिसरातील मलजल थेट बंधाऱ्यापर्यंत पोहोचत असल्याने दूषित पाण्याचा पुरवठा सुरू झाला आणि नाशिकरोड विभागातील नगरसेवकांनी त्यास विरोध केला आणि तेथून उपसा बंद केला. यामुळे समस्या निर्माण झाली आहे.
गंगापूर धरणावर ताण
n गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून चेहेडी बंधाऱ्यातून नाशिकरोड विभागाला दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले असून त्याऐवजी गंगापूर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
n दारणा धरणात ४०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित असला तरी दारणा धरणातून पाणी उचलले गेले नाही. या धरणात महापालिकेने जेमतेम १६ दशलक्ष घनफूट पाणी उचलले आहे, तर दुसरीकडे गंगापूर धरणातून अतिरिक्त दाेनशे दशलक्ष घनफूट पाणी उचलावे लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे.