क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला ४० हजार नागरिकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 01:40 AM2022-04-18T01:40:58+5:302022-04-18T01:41:51+5:30
कोरोना संकटामुळे दोन वर्षांनंतर क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला तब्बल ४० हजार नागरिकांनी भेट दिली. त्यामुळे आगामी १५ ते २० दिवसांत सुमारे दोन हजार घरांचे बुकिंग होऊन बांधकाम उद्योग क्षेत्रात सुमारे ६०० कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा क्रेडाईचे सभासद बांधकाम व्यावसायिकांनी क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्फोच्या समारोपप्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन यांनी रविवारी (दि.१७) व्यक्त केली.
नाशिक : कोरोना संकटामुळे दोन वर्षांनंतर क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला तब्बल ४० हजार नागरिकांनी भेट दिली. त्यामुळे आगामी १५ ते २० दिवसांत सुमारे दोन हजार घरांचे बुकिंग होऊन बांधकाम उद्योग क्षेत्रात सुमारे ६०० कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा क्रेडाईचे सभासद बांधकाम व्यावसायिकांनी क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्फोच्या समारोपप्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन यांनी रविवारी (दि.१७) व्यक्त केली.
क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ ला भेट देणाऱ्यांमध्ये नाशिकसह जळगाव, धुळे, अहमदनगर, ठाणे, मुंबई व पुणे येथील नागरिकांचा समावेश होता. यातील सुमारे ३८० नागरिकांनी नाशिक शहरातील विविध बांधकाम प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन घरांची बुकिंग केले, तर हजारो ग्राहकांनी प्रकल्पांना भेट देऊन वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये घरांची, दुकानांची पाहणी केली. राष्ट्रीय क्रेडाईचे सल्लागार (घटना समिती) जितूभाई ठक्कर, राष्ट्रीय क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्रचे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, किरण चव्हाण, नेमीचंद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष कृणाल पाटील व मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, श्रेणिक सुराणा, सागर शहा, सुशील बागड, अनंत ठाकरे, सचिन बागड, अतुल शिंदे, सचिन चव्हाण तसेच सर्व सदस्यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.
इन्फेा...
कनेक्टिविटीमुळे संधींची कवाडे उघडली - गोडसे
डोंगरे वसतिगृह मैदानावरील चार दिवसीय क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचा रविवारी (दि. १७) खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. यावेळी त्यांनी प्रॉपर्टी एक्स्पोच्या आयोजनासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोविषयी गौरवोद्गार काढतानाच शहराच्या वाढलेल्या कनेक्टिविटीमुळे संधींची अनेक कवाडे नाशिकसाठी उघडल्याचे नमूद केले. तसेच येणाऱ्या काळात नाशिक विमान सेवेद्वारे अनेक महत्त्वाच्या शहरांशी जोडले जाणार असून नाशिक-पुणे रेल्वे सेवेचेही काम प्रगतीपथावर आहे. कनेक्टिविटी वाढल्यास अनेक संधी नाशिकला मिळतील, ज्याने सर्व शहराला त्याचा लाभ होणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.