दोन दिवसांत ४०२ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 01:04 AM2020-11-16T01:04:14+5:302020-11-16T01:05:21+5:30

जिल्ह्यात गत दोन दिवसांत एकूण ४०२ नवीन बाधित रुग्ण दाखल झाले असून, ५२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर नाशिक शहराला आणि ग्रामीणमध्ये ३ असे एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १७३० झाली आहे.

402 new patients in two days | दोन दिवसांत ४०२ नवीन रुग्ण

दोन दिवसांत ४०२ नवीन रुग्ण

googlenewsNext
ठळक मुद्देदीप आशेचा : ५२६ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात गत दोन दिवसांत एकूण ४०२ नवीन बाधित रुग्ण दाखल झाले असून, ५२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर नाशिक शहराला आणि ग्रामीणमध्ये ३ असे एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १७३० झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ९७ हजार ०३८ वर पोहोचली असून, त्यातील ९२ हजार ७९३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. २५१५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.६३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.०२, नाशिक ग्रामीणला ९५.१७, मालेगाव शहरात ९३.१३, तर जिल्हाबाह्य ९३.१२ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २५१५ बाधित रुग्णांमध्ये १६७० रुग्ण नाशिक शहरात, ७१३ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १२० रुग्ण मालेगावमध्ये, तर १२ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीन लाख ५२ हजार ५६३ असून, त्यातील दोन लाख ५२ हजार ५२१ रुग्ण निगेटिव्ह, तर ९७ हजार ०३८ रुग्ण बाधित आढळून आले असून, २७४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: 402 new patients in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.