४१ घरमालकांवर गुन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:56 AM2018-06-04T00:56:00+5:302018-06-04T00:56:00+5:30
सातपूर: भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत असून, सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील ४१ घरमालकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आल्याने घरमालकांमध्ये धावपळ उडाली आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातपूर: भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत असून, सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील ४१ घरमालकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आल्याने घरमालकांमध्ये धावपळ उडाली आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
घर भाड्याने दिल्यानंतर सदर भाडेकरूची संपूर्ण माहिती नजीकच्या पोलीस स्टेशनला तातडीने देणे आवश्यक आहे. पोलिसांकडून याबाबतचे निवेदन वारंवार जाहीर करण्यात आले आहे. मात्र अजूनही बहुतांश लोकांना अशा प्रकारची माहिती पोलिसांना द्यायची असते, याची माहितीच नाही. लोकांमध्ये याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. पोलिसांच्या भीतीपोटी अनेकजण पोलिसांपासून चार हात दूर राहणेच पसंत करतात. त्यामुळे पोलीस स्टेशनला माहिती देण्यासाठी जाणेही अनेकजण टाळतात.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन शहरात भाड्याने राहात असलेल्या देशी, परदेशी लोकांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध असावी,
म्हणून भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. भाडेकरूंची माहिती भरून देण्यासाठी लागणारा अर्ज स्थानिक पोलीस ठाण्यात उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात लोकांकडून हे अर्ज घेण्यासाठी एका पोलीस कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. कायद्यानुसार घरमालकाने घर भाड्याने देताना संबंधित भाडेकरूची सविस्तर माहिती पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक आहे. घरमालकांनी संबंधित भाडेकरूची माहिती रजिस्टर पोस्टाने, कुरिअरने अथवा स्वत: अथवा विश्वासू व्यक्तीमार्फत पोलीस ठाण्यात सादर करावी. भाडेकरूला घर दिल्यानंतर घरात किंवा त्याच्याकडून शहरात गुन्हा घडल्यास पोलिसांना त्याचा तपास करण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो. भाडेकरूंची तातडीने माहिती न देणाºया घरमालकांविरुद्ध भादंवि कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात येते. दरम्यान, नाशिक पोलीस आयुक्तालयातील एकट्या सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील ४१ घरमालकांवर आतापर्यंत भादंवि कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विवेक किशोर भदाणे यांनी दिली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असून घरमालकांनी भाडेकरूंची माहिती सादर करावी, असे आवाहन भदाणे यांनी केले आहे.