जिल्ह्यात ४१२२ बाधित; २४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:50+5:302021-04-08T04:15:50+5:30

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. ३१) एकूण ४१२२ रुग्ण बाधित आढळून आले असून, एकाच दिवसात २४ जणांचा बळी ...

4122 affected in the district; 24 victims | जिल्ह्यात ४१२२ बाधित; २४ बळी

जिल्ह्यात ४१२२ बाधित; २४ बळी

Next

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. ३१) एकूण ४१२२ रुग्ण बाधित आढळून आले असून, एकाच दिवसात २४ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २५५३ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येने यंत्रणादेखील अपुरी पडू लागली आहे. कोरोनाचे थैमान सुरूच असून, त्यात सतत वाढ होऊ लागल्याने आरोग्य विभाग, तसेच नाशिककरांच्या चिंतेतही भर पडली आहे. बुधवारी पुन्हा चार हजारांहून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २३७९, नाशिक ग्रामीणमध्ये १५५८, मालेगाव मनपा क्षेत्रात ९३, तर जिल्हा बाह्य क्षेत्रामध्ये ९२९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उपचाराथी रुग्णांची संख्या तब्बल ३२४१० वर पोहोचली आहे. शहरासह जिल्ह्यातील रुग्णांसह जिल्ह्याबाहेरून नाशिकच्या रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येत ऑक्सिजन बेडदेखील मिळण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील खूप खाली आले असून, बुधवारी हे प्रमाण ८३.४९ टक्क्यांवर आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात ३८५६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. शनिवारी बळी गेलेल्या नागरिकांपैकी ११ नागरिक नाशिक मनपा क्षेत्रातील, नऊ नाशिक ग्रामीणमधील आणि चार जिल्हा बाह्य रुग्ण आहेत.

इन्फो

प्रलंबित चार हजारांवर

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना प्राप्त होणाऱ्या अहवालांचे प्रमाण त्या पटीत वाढू शकलेले नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या नमुन्याचा तपासणी अहवाल मिळण्यास सातत्याने विलंब होत आहे. जिल्ह्यात गुरुवारी प्रलंबित अहवालांची संख्या थेट ४६२३ वर पोहोचली आहे.

इन्फो

कोरोनामुक्त साडेतीन हजारांवर

कोरोनामुक्तच्या आकड्यात ही भर

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंतेत मोठी भर पडलेली असतानाच कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. ही बाब त्यातल्या त्यात काहीशी समाधानकारक आहे. बुधवारी नाशिक जिल्ह्यातील ३८५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढीमुळे वाटणारी चिंता सतत वाढत चालली आहे.

Web Title: 4122 affected in the district; 24 victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.