४२ लाखांचा गुटखा वणीजवळ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:30 AM2018-11-28T01:30:11+5:302018-11-28T01:30:50+5:30
नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी-सापुतारा रस्त्यावर करंजखेड फाट्याजवळ सापळा रचून वणीकडे येणारा ट्रक अडवून ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. चालकास ताब्यात घेत ट्रक जप्त करण्यात आला.
वणी : नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी-सापुतारा रस्त्यावर करंजखेड फाट्याजवळ सापळा रचून वणीकडे येणारा ट्रक अडवून ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. चालकास ताब्यात घेत ट्रक जप्त करण्यात आला.
ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी - सापुतारा रस्त्यावर सापळा रचला. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान सापुताऱ्याकडून वणीच्या दिशेने येणाºया ट्रकला (क्र. एमएच १४ ईएम ३४९७) या पथकाने अडवून चालकास ताब्यात घेतले. ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये सत्तर गोण्यामध्ये पॅकिंग केलेली आरएमडी सुगंधी तंबाखू, मिराज सुगंधी तंबाखू, तुलसी रॉयल जाफरानी सुगंधी तंबाखू, रजनीगंधा पानमसाला, विमल पानमसाला, व्ही. सुगंधी तंबाखू असा गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू असलेल्या गोण्यांमधील ३०,६०० पुडे किंमत ४२ लाख ८ हजार ६०० व आयशर ट्रक असा एकूण ५३ लाख ८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दराडे सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, हवालदार दीपक आहिरे, संजय गोसावी, पुंडलिक राऊत यांच्या पथकाने सदर कारवाई केली.
अन्न व औषध प्रशानाचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद शिवलाल पाटील यांच्या तक्र ारीवरून पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकचालक उद्धव रामराव राठोड, रा. चिमेगाव, ता. औराई, जि. बिदर (पिंपरी चिंचवड) यास अटक करण्यात आली असून, गाडी मालक नीलेश रामराव महानवर रा. भिरवड फाटा, पिंपरी चिंचवड हा फरार आहे.